सायबर गुन्हे (Cyber crime) रोखण्यासाठी केंद्र सरकार ‘AI’चा वापर करणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘सायबर सुरक्षा आणि सायबर गुन्हे’ (Cyber Security and Cyber Crime) या विषयावरील संसदीय सल्लागार समितीच्या बैठकीत ही माहिती दिली. (Amit Shah)
अमित शाह म्हणाले की, सायबर गुन्हे बनावट बँक खात्यांद्वारे (Fake bank account) केले जातात. यामुळे बेकायदेशीर कारवाया वाढतात. सरकार ‘एआय’च्या मदतीने अशा खात्यांवर कारवाई करेल, असे ते म्हणाले. केंद्रीय गृहमंत्र्यांनी सायबर गुन्ह्यांना तोंड देण्यासाठी उचललेल्या पावलांची बैठकीत ही माहिती दिली. तसेच त्यांनी समितीला सांगितले की, भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या (आय ४सी) शिफारशींनुसार ८०५ अॅप्स आणि ३ हजार २६६ संकेतस्थळांच्या लिंक्स ब्लॉक करण्यात आल्या आहेत. यासोबतच, ३९९ बँका आणि वित्तीय मध्यस्थांसह सहा लाखांहून अधिक संशयास्पद डेटा सामायिक करण्यात आले आहेत. तसेच बनावट बँक खाते म्हणजे सायबर गुन्ह्यातून मिळवलेले पैसे हस्तांतरित करण्यासाठी गुन्हेगारांकडून वापरले जाणारे बैंक खाते; याशिवाय सरकार सायबर गुन्ह्यांबाबत लोकांना जागरूक करत आहे.
(हेही वाचा – दोषी ठरलेल्या राजकारण्यांना निवडणूक लढविण्यास बंदी? Supreme Court ने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाकडे मागितले उत्तर )
१९ लाखांहून अधिक बनावट बँक खाती
१९ लाखांहून अधिक बनावट बँक (Bank) खाती आढळून आली आहेत. तसेच २ हजार ३८ कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार ब्लॉक करण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सर्व बँकांशी समन्वय साधून, बनावट खाती ओळखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय वापरण्याचे प्रयत्न केले जात असल्याची माहिती शाह यांनी दिली. तसेच गृहमंत्र्यांनी समितीच्या सर्व सदस्यांना १९३० या हेल्पलाईन क्रमांकाची जाहिरात करण्यास सांगितले आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community