Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतून मिचेल स्टार्क बाहेर, स्टिव्ह स्मिथ करणार ऑस्ट्रेलियन संघाचं नेतृत्व

Champions Trophy 2025 : वैयक्तिक कारणाने स्टार्कने माघार घेतली आहे. 

121
Champions Trophy 2025 : पाकवरील दिमाखदार विजयासह भारतीय संघ गटात अव्वल तर पाक तळाला
Champions Trophy 2025 : पाकवरील दिमाखदार विजयासह भारतीय संघ गटात अव्वल तर पाक तळाला
  • ऋजुता लुकतुके

चॅम्पियन्स करंडकासाठी संघात बदल करण्याची ११ फेब्रुवारी ही शेवटची तारीख होती आणि भारतीय संघात जसे दोन मोठे बदल झाले आहेत, तसंच ऑस्ट्रेलियन संघातही मिचेल स्टार्कने माघार घेतल्यामुळे नेतृत्वातच बदल झाला आहे. आधी पॅट कमिन्सने दुसऱ्या मुलीच्या जन्मासाठी पितृत्वाची रजा घेतल्यामुळे संघाचं नेतृत्व मिचेल स्टार्ककडे आलं होतं. आता स्टार्कही वैयक्तिक कारणांमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाचं नेतृत्व स्टिव्ह स्मिथ करणार आहे. मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स हे तीनही ऑस्ट्रेलियाचे मुख्य तेज गोलंदाज ही स्पर्धा खेळणार नाहीएत. (Champions Trophy 2025)

२०२३ मध्ये भारतात झालेल्या एकदविसीय विश्वचषकात हे तीनही खेळाडू ऑस्ट्रेलियन संघाचा मुख्य भाग होते. मार्कस स्टॉइनिस आणि मिचेल मार्श यांनीही दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली असल्यामुळे स्टिव्ह स्मिथ आणि ट्रेव्हिस हेड वगळता नवा कोरा ऑस्ट्रेलियन एकदिवसीय संघ स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. (Champions Trophy 2025)

(हेही वाचा – Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेला अजूनही आशा भारतीय कसोटी संघात पुनरागमनाची)

श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत मिचेल स्टार्कने चारच षटकं टाकली होती आणि त्यानंतर त्याच्या डाव्या पायाचा घोटा दुखावल्याचं कारण देत तो उर्वरित कसोटी खेळलाही नव्हता. पण, यावेळी माघार घेताना स्टार्कने आपलं खाजगीपण जपण्यात यावं आणि माघारीच्या निर्णयावर कुठलंही स्पष्टीकरण मागण्यात येऊ नये, असं म्हटलं आहे. (Champions Trophy 2025)

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मिचेल स्टार्कच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो, असं म्हटलं आहे. मिचेल स्टार्क सध्या कसोटीत ४०० बळी मिळवण्याच्या उंबरठ्यावर आहे. तर तो १०० आंतरराष्ट्रीय कसोटींच्याही जवळ आहे. स्टार्कच्या माघारीमुळे या स्पर्धेत तेज गोलंदाजांची तोफ फारशी धडाडणारच नाही असं दिसतंय. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे खेळणार नाहीए. त्यातच ऑस्ट्रेलियाचे तीनही महत्त्वाचे गोलंदाज खेळत नाहीएत. (Champions Trophy 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.