शिवाजीनगर बसस्थानक पुनर्बांधणीला गती; DCM Ajit Pawar यांनी घेतला आढावा

43
शिवाजीनगर बसस्थानक पुनर्बांधणीला गती; DCM Ajit Pawar यांनी घेतला आढावा
  • प्रतिनिधी

पुणे शहराच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या शिवाजीनगर बसस्थानकाच्या पुनर्बांधणीला गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. हा प्रकल्प ‘सार्वजनिक-खासगी भागीदारी’ (PPP) तत्वावर उभारण्यात येणार असून, ‘महामेट्रो’ आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले.

या बैठकीस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शिवाजीनगर बसस्थानकाच्या जागेवरील चटई क्षेत्राचा (FAR) उपयोग करून आर्थिक गुंतवणूक सुलभ करण्यात येणार आहे. १ मे २०२५ रोजी, महाराष्ट्र दिनी, या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी (DCM Ajit Pawar) दिले.

(हेही वाचा – अखेर Sunita Williams आणि Butch Wilmore यांच्या परतीचा महिना ठरला)

प्रकल्पाची वैशिष्ट्ये :
  • आधुनिक बसस्थानकासह व्यावसायिक संकुल
  • वाहनतळासाठी दोन तळघर आणि बसस्थानक तळमजल्यावर
  • शासकीय व खाजगी कार्यालयांसाठी १६ मजली इमारत

शिवाजीनगर आणि स्वारगेट बसस्थानकांच्या पुनर्विकासामुळे ST बससेवा अधिक नियोजनबद्ध होईल, प्रवाशांना आधुनिक सुविधा मिळतील आणि वाहतुकीस गती येईल. पुणेकरांसाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.