शिवसेना उबाठा गटाला आणखी एक धक्का! अखेर Rajan Salvi यांचा राजीनामा

169

शिवसेना उबाठा गटाचे (Shiv Sena UBT Group) रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार राजन साळवी (Ex MLA Rajan Salvi) यांनी पक्षातील उपनेते पदाचा मंगळवार, १२ फेब्रुवारी रोजी राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजन साळवी हे शिवसेना उबाठा गटातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यांनी दिलेल्या उपनेते पदाच्या राजीनाम्यानंतर (Rajan Salvi Resigns) यावर आता शिक्कामोर्तब होत आहे. तसेच राजन साळवी हे गुरुवारी दुपारी शिवसेना पक्षात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याचे समजते.  (Rajan Salvi)

WhatsApp Image 2025 02 12 at 4.35.28 PM
काही महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीत राजन साळवी यांचा शिवसेनेच्या किरण सामंत यांनी पराभव केला होता. किरण सामंत हे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे भाऊ आहेत. गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा होती की, राजन साळवी शिवसेना उबाठा गटावर नाराज आहेत. ते पक्ष सोडून इतर पक्षात जातील अशी चर्चा होती.

राजन साळवी गुरुवारी शिवसेना पक्षात सामील होणार 

मिळालेल्या माहितीनुसार, राजन साळवी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील होणार आहे. तसेच राजन साळवी गुरुवारी दुपारी ३ वाजता ठाण्यातील आनंदाश्रमात अधिकृतपणे शिवसेना पक्षात सामील होतील. दुपारी १ वाजता, ते नवी मुंबईतील सिडको भवन (CIDCO Bhavan) येथून हजारो कामगारांच्या ताफ्यासह ठाण्यात पोहोचतील.

(हेही वाचा – सायबर गुन्हे रोखण्यासाठी केंद्र सरकार ‘एआय’चा वापर करणार; Amit Shah यांची माहिती)

अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडली होती. दोन गट तयार झाले. सुरुवातीला ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले आणि भाजपासोबत सरकार स्थापन केले, परंतु राजन साळवी उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजन साळवी पक्ष सोडणार असल्याच्या बातम्या सतत येऊ लागल्या. मात्र आता शिवसेना पक्षाची कोकणात आणखी ताकद वाढण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे. 

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.