दरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले, "हा फक्त एका व्यावसायिक कार्यक्रमापेक्षा जास्त आहे, हे भारत आणि फ्रान्समधील प्रतिभाशाली विचारांचा संगम आहे. तुम्ही नवोपक्रम, सहकार्य आणि पुनरुज्जीवनाचा मंत्र स्वीकारत आहात, प्रगती करत आहात. बोर्डरूम कनेक्शन निर्माण करण्यापलीकडे, तुम्ही भारत आणि फ्रान्समधील धोरणात्मक भागीदारी सक्रियपणे मजबूत करत आहात, असंही मोदी म्हणाले.