Air Pollution रोखण्यासाठी धोबी घाटावर विशेष लक्ष; घेतला ‘हा’ निर्णय

50
Air Pollution रोखण्यासाठी धोबी घाटावर विशेष लक्ष; घेतला 'हा' निर्णय
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील येणाऱ्या महालक्ष्मी येथील धोबी घाट परिसरात मोठ्याप्रमाणात लाकूड आणि चिंध्यांचा वापर आगभट्ट्यांमध्ये करण्यात येतो. त्यामुळे वायू प्रदूषणात वाढ होत असल्याने महापालिकेने लाकडांचा वापर करण्यात येणाऱ्या बेकऱ्यांना भट्ट्यांमध्ये पीएनजीचा वापर करण्याचे बंधनकारक केले आहे. त्यानुसार महालक्ष्मी येथील धोबीघाटांमध्येही जळावू लाकडांचा वापर केला जात असल्याने त्याठिकाणी पीएनजीसाठी पाऊल उचलले आहे. त्यादृष्टीकोनातून त्याठिकाणी पीएनजीची उभारणी केली जात आहे. (Air Pollution)

मुंबई महानगरपालिकेअंतर्गत असलेल्या महालक्ष्मी धोबी घाटाची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख आहे. या धोबी घाटाचा विस्तार सुमारे ८१.४९ चौ. मी असून सन २०११ मध्ये जगातील सर्वांत मोठा धोबी घाट म्हणून याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डद्वारे नोंद झाली आहे. धोबी घाटावर काम करणारा धोबी समाज हा धोबी कल्याण आणि औद्योगिक विकास सहकारी संस्था मर्यादितशी संलग्न आहे. धोबी घाटातील कामगारांना दैनंदिन कामकाजा दरम्यान उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ही संस्था स्थापन केली गेली. (Air Pollution)

(हेही वाचा – मराठी भाषा आणि छत्रपती शिवाजी महाराज अध्यासनासाठी महाराष्ट्र शासन सर्वप्रकारे सहकार्य करणार; Uday samant यांचे आश्वासन)

गेल्या अनेक वर्षापासून धोबी बांधव कपडे धूणे, रंगरंगोटी करण्यासंबंधीचे कामकाज करत आहेत. या ठिकाणी कपडे वाळविणे आणि कपड्यांना इस्त्री करणे, या प्रक्रियेमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा वापर, भट्टी जाळण्यासाठी आणि पाणी उकळण्यासाठी इंधन म्हणून लाकडी सामुग्रीसह रसायने असलेल्या चिंध्या, टाकाऊ कापड आणि टाकाऊ प्लास्टिकचा वापर यांचा समावेश होतो. (Air Pollution)

या पद्धतीमुळे येथे काम करणाऱ्या लोकांमध्ये दमा, क्षयरोग तसेच कर्करोगासारख्या दुर्धर आजाराचे प्रमाणे वाढले आहे. शिवाय अशा ज्वलनामुळे मुंबईच्या पर्यावरणातील प्रदुषके वाढवण्यात मोठा हातभार लागतो. दररोज मोठ्या प्रमाणात एलपीजी सिलिंडर वापरले जात असल्याने सध्याच्या जागेच्या मर्यादांमुळे स्टोरेज मर्यादांचा सामना करावा लागतो. तसेच एलपीजी सिलिंडरचा वापर त्यास एलपीजी सिलिंडरचा स्फोट होऊन अपघात होण्याची शक्यता अधिक असते. (Air Pollution)

(हेही वाचा – शिवसेनेचे माजी खासदार Rahul Shewale यांचे अमित शाह यांना पत्र; म्हणाले…)

याउलट, पीएनजी पर्यावरणपूरक असल्याने एलपीजीपेक्षा सुरक्षित आहे. तसेच किफायतशीरही आहे. एलपीजीच्या धोक्यांमुळे धोबी कल्याण आणि औद्योगिक विकास सहकारी संस्था मर्या., आणि धोबी घाट समाजाने धोबी घाटातील थेट ग्राहकांसाठी स्वतंत्र पाईप गॅस जोडणीची मागणी केली आहे. महालक्ष्मी धोबी घाट ही मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या ठिकाणच्या ऐतिहासिक वारसाचे जतन आणि संवर्धन करणे आवश्यक असल्याने धोबी घाटवर पीएनजी वितरण व जोडणी तसेच सुयोग्य उपकरणे आदींची उभारणी केली जात असल्याचे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या कामांसाठी महापालिकेच्यावतीने सुमारे २४ कोटी रुपये खर्च केले जाणार असून यासाठी ओशिऍनिक इंजिनिअर्स अँड कन्सल्टंस या कंपनीची निवड करण्यात आली आहे. (Air Pollution)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.