tadasana benefits : शरीराला चांगला फायदा व्हावा म्हणून ताडासन कसे करावे?

28
tadasana benefits : शरीराला चांगला फायदा व्हावा म्हणून ताडासन कसे करावे?
ताडासन म्हणजे काय?

‘ताडासन’ हा शब्द दोन शब्दांपासून बनलेला आहे. ‘ताड’ म्हणजे ‘झाड’ आणि ‘आसन’ म्हणजे ‘स्थती’ होय.
ताडाच्या झाडासारख्या स्थितीत उभं राहणं म्हणजेच ताडासन होय.

ज्यावेळी एखादी व्यक्ती ताडासनात उभी राहते तेव्हा त्यांच्या पाठीचा कणा नैसर्गिकरित्या ताठ होतो. यामुळे पाठीच्या कण्याचं चैतन्य वाढतं. ताडासन हे सूर्य नमस्काराची सुरुवातीची स्थिती आहे.

ताडासन हे स्नायूंच्या हालचाली आणि ताठरतेवर अवलंबून असते. ताडासन केल्यामुळे शरीराचे स्नायू बळकट होतात आणि वाकलले पाठीचे मणके सरळ होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त खांदे, घोटे, मांड्या, गुडघे आणि पाठही मजबूत होते. (tadasana benefits)

ताडासन कसे करावे?

ताडासन करण्यासाठी सर्वांत आधी दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून उभे राहा. दोन्ही पायांवर समान प्रमाणात येईल असे उभे राहा. डोके मागे करून पाठीचा कणा ताठ करा. तुमच्या संपूर्ण शरीराला ताण येईल असे उभे राहा. तीन सेकंद ते एक मिनिटापर्यंत ही पोज धरून श्वासोच्छ्वास करा. (tadasana benefits)

(हेही वाचा – Delhi Transport Department च्या ६ अधिकाऱ्यांना अटक; भ्रष्टाचार व लाचखोरी प्रकरणी सीबीआयची कारवाई)

ताडासनाचा सराव करण्यासाठी लक्षात ठेवण्यासारखे महत्त्वाचे काही मुद्दे :
  • पायांची स्थिती : तुमचे पाय समांतर ठेवा आणि दोन्ही पायांवर समान वजन येईल असे उभे राहा.
  • कोअर स्नायू : तुमच्या कोअर स्नायूंना जोडण्यासाठी तुमची नाभी हळूवारपणे आतल्या बाजूला ओढा आणि तुमच्या मणक्यावर ताण येईल असे हळूहळू स्ट्रेच करा.
  • श्वासोच्छ्वास : सरळ समोर एका स्थिर बिंदूवर लक्ष केंद्रित करून श्वासोच्छ्वास करा.

सुरुवातीला तुम्ही ताडासन करण्यासाठी भिंतीचा आधारही घेऊ शकता. जर तुम्ही पहिल्यांदा योगासने करत असाल, तर पात्र योग प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली ताडासनाचा सराव करा. (tadasana benefits)

ताडासन कधी करावे?

ताडासन हे दिवसाच्या कोणत्याही वेळी हे करता येतं. इतर पहिल्या-स्तरीय योगासनांप्रमाणे, हे आसन करताना पोट रिकामे असणं बंधनकारक नाही. पण जर तुम्ही पूर्ण-वेळ योगाभ्यास करत असाल आणि त्यानंतर इतर योगासने करत असाल, तर हे आसन करण्यापूर्वी किमान ४ ते ६ तास आधी जेवण करायला हवं. (tadasana benefits)

(हेही वाचा – Rajan Salvi यांच्या पाठोपाठ आणखी काही नेत्यांचा उद्धव ठाकरे यांना ‘जय महाराष्ट्र’?)

ताडासनाचे फायदे काय आहेत?
  • पाठीचे पोक जाते

ज्यांना चालताना किंवा बसताना पोक काढण्याची सवय असते त्यांच्यासाठी ताडासनाचा सराव खूप मदत करू शकतो. हे आसन नियमितपणे केलं तर पाठीला पोक आल्यामुळे होणारी पाठदुखी हळूहळू नाहीशी होते. शेवटी एकूण आसनाची स्थिती सुधारते आणि व्यक्तीला नैसर्गिकरित्या उभे राहण्यास मदत होते. (tadasana benefits)

  • उंची वाढविण्यात मदत

ज्यांची उंची कमी असते त्यांनी त्यांच्या किशोरावस्थेत या आसनाचा सराव सुरू करावा, जेणेकरून त्यांच्या उंचीमध्ये काही अतिरिक्त इंच वाढ होईल. हे आसन करताना शरीराच्या वाढीच्या संप्रेरकाचे उत्पादन वाढते. त्यामुळे शरीराची उंची वाढायला मदत होते.

  • मानसिक जागरूकता वाढवते

योगासनात केवळ शारीरिक हालचाल आणि श्वासोच्छ्वास करण्यास मदत होत नाही तर त्यामुळे ध्यान (मेडिटेशन) करण्यास देखील मदत मिळते. ताडासन हे शरीरातल्या सप्तचक्रांना जागृत करते आणि मानसिक जागरूकता वाढवून त्यांच्या खोल चेतनेशी जोडण्यास मदत करते. त्यामुळे अंतर्ज्ञान जागृत होण्यास मदत होते आणि मनातली अंधुकता दूर होते. याचा नियमित सराव केल्याने मन शांत आणि संयमी होतं. तसंच योग्य आणि सकारात्मक निर्णय घेता येतात आणि नैराश्यावर मात करता येते. त्याचबरोबर मज्जासंस्था देखील मजबूत होते. (tadasana benefits)

  • वजन कमी करण्यास मदत होते

योगासनांमुळे फक्त शारीरिक कार्ये सुधारत नाहीत तर योग्य वजन राखण्यास देखील मदत मिळते. इतर योगासनांसोबत, ताडासनामुळे शरीराचे चयापचय सुधारते आणि कॅलरीज लवकर बर्न करण्यास मदत करते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.