हिंदू म्हणून कुणी हाक मारायची वाट बघू नका; झाराप येथील घटनेनंतर आमदार Nilesh Rane यांचे हिंदूंना आवाहन

57
हिंदू म्हणून कुणी हाक मारायची वाट बघू नका; झाराप येथील घटनेनंतर आमदार Nilesh Rane यांचे हिंदूंना आवाहन

हिंदू (Hindu) धर्म टिकला तर आपण टिकू. हिंदू (Hindu) धर्म आणि आपली संस्कृती टिकली पाहिजे. यासाठी कुणी हाक मारायची प्रतिक्षा करू नका. एकत्र या आणि संघटितपणे हिंदूंच्या विरोधातील घटनांना चोख उत्तर द्या, असे आवाहन आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी झाराप येथील घटनेसंदर्भात केले. झाराप येथील श्री देवी भावई मंदिरात सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित महाआरती नंतर ते बोलताना केले. (Nilesh Rane)

( हेही वाचा : Sharad Pawar यांच्या Shinde स्तुतीमुळे उबाठामध्ये अस्वस्थता!)

झाराप झिरो पॉईंट येथे काही दिवसांपूर्वी पुणे येथील पर्यटकांना चहाच्या विषयावरून माराहाण होण्याची घटना घडली होती. यानंतर संबंधित टपरी काढून टाका अन्यथा आपण स्वतः ती टपरी दि. १२ फेब्रुवारी रोजी हटवू, असा इशारा आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी दिला होता. यानंतर दि. १० फेब्रुवारी रोजी ही टपरी काढून टाकण्यात आली. यानंतर आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या प्रमुख उपस्थितीत झाराप येथील श्री देवी भावई मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी असंख्य हिंदू समाज बांधव उपस्थित होते. या महाआरती नंतर आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी उपस्थित हिंदू बांधवांना मार्गदर्शन केले.

यावेळी राणे (Nilesh Rane) म्हणाले की, झाराप येथील घटनेनंतर हिंदू बांधवांना हाक देण्याची गरज नव्हती. त्यांनी स्वतःहून एक आले पाहिजे होते. ही घटना अतिशय वाईट असून ही घटना घडताना पाहणारे हिंदू काय करत होते ? कोणीही हिंदूंना असे हलक्यात घेऊ नये. टपरी काढल्यानंतर विषय संपलेला नाही. हिंदूचे (Hindu) हे भगवे वादळ दाखवायचे होते. आता हिंदू (Hindu) एकजुटीचे हे वातावरण आपल्याला असेच टिकवायचे आहे. यासाठी कोणाच्या हाकेची वाट पाहू नका. हिंदू पण कडवट आहेत हे दाखवून दिले पाहिजे. नाहीतर हे असेच होत राहणार. इतिहास जर वाचला तर लक्षात येते की, आपण तेव्हाही बेसावध होतो, आजही बेसावधच आहोत. हिंदू (Hindu) समाज किती वर्षे अजून सहन करणार आहे. लव जिहाद (Love jihad), लॅण्ड जिहाद (Land Jihad) झाले आता अजून कोणते जिहाद राहिले आहेत? आता हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. हा कोणताही राजकीय विषय नसून धर्म हा राजकारणाचा विषय नाही. २० टक्के असूनही पोलीसांना बाजूला करण्याची भाषा केली जात आहे. रत्नागिरी मधील प्रकार आता सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत पोहचले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून हिंदू शिल्लक आहेत, असे सांगत हिंदू म्हणून आता संघटित होण्याची वेळ आली आहे, असेही राणे म्हणाले.

तसेच हिंदू (Hindu) आहोत तर हिंदू (Hindu) म्हणून जगायला शिका. हिंदूच्या (Hindu) मुली या मुली नसतात का? जेव्हा धर्म बोलवतो तेव्हा धर्मासाठी एक आलेच पाहिजे. स्व. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांनी प्रेरित होऊन एकत्रित या, असेही राणेंनी (Nilesh Rane) सांगितले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती रायगड किल्ले अध्यक्ष सुनील पवार (Sunil Pawar), जिल्हा महिला प्रमुख वर्षा कुडाळकर, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब, कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांच्यासह अनेक हिंदू बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दादा साईल यांनी केले.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.