प्रयागराजमध्ये (Prayagraj) आयोजित महा कुंभात (MahaKumbh 2025) मौनी अमावस्येला झालेल्या चेंगराचेंगरीत 30 भाविकांना आपला जीव गमवावा लागला. (Maha Kumbh stampede) या प्रकरणी उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) पोलीस प्रमुख डीजीपी प्रशांत कुमार यांनी आपली चूक मान्य केली आहे.
(हेही वाचा – ‘मोफत’ योजनांमुळे लोकांना काम नको; लाडकी बहीणसारख्या योजनांवर Supreme Court चं परखड मत)
मौनी अमावस्येच्या (Mauni Amavasya) दिवशी गर्दी व्यवस्थापनात एक छोटीशी चूक झाली. त्या दिवशी झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांना जीव गमवावा लागला. आम्ही या चुकीपासून खूप काही शिकलो आणि चांगल्याप्रकारे गर्दी हाताळण्याचे काम केले. माघी पौर्णिमेचे स्नान हे पाचवे स्नान असून आता महाशिवरात्रीचे स्नान बाकी आहे. आता उत्तर प्रदेश पोलीस अधिक चांगल्या व्यवस्थापनासाठी काम करत आहे. मौनी अमावस्येनंतरही दररोज करोडो लोक येथे येत आहेत, मात्र आता कुठेही अडचण आली नाही, अशा शब्दांत उत्तरप्रदेश पोलिसांनी त्यांची चूक स्वीकारली आहे. उत्तरप्रदेशचे डीजीपी प्रशांत कुमार हे माघी पौर्णिमेनिमित्त भाविकांची गर्दी आणि गर्दी व्यवस्थापनाबाबत माध्यमांशी बोलत होते.
डीजीपी प्रशांत कुमार पुढे म्हणाले की, गर्दी व्यवस्थापनासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला. त्यामुळे दररोज कोट्यवधी भाविक संगमात सुरक्षितरित्या स्नान करत आहेत. आतापर्यंत ४६ ते ४७ कोटी लोकांनी महाकुंभात संगमस्नान केले आहे. माघी पौर्णिमेनिमित्तही कोट्यवधी लोकांनी स्नान केले. महाकुंभाव्यतिरिक्त, गर्दी व्यवस्थापनाची पद्धत चित्रकूट, काशी विश्वनाथ (Kashi Vishwanath) मंदिर, विंध्याचलमधील विंधवासिनी मंदिर, अयोध्येतील (ayodhya ram mandir) श्री रामजन्मभूमी मंदिरातही अवलंबण्यात आली आहे.
या सर्व मंदिरांमध्ये होणाऱ्या गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी राजधानी लखनऊमध्ये एक वॉर रूम तयार करण्यात आली आहे. या वॉर रूममधूनच ठिकठिकाणी गर्दीची परिस्थिती आणि व्यवस्थापनाच्या पद्धती पाहिल्या जात आहेत. एकट्या महाकुंभनगरीत 2500 हून अधिक हाय रिझोल्युशन कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या सर्व कॅमेऱ्यांमधून थेट फीड घेण्यात येत आहे. इतर मंदिरांमध्येही अशीच व्यवस्था करण्यात आली आहे, अशीही माहिती डीजीपी प्रशांत कुमार यांनी दिली. (MahaKumbh 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community