-
ऋजुता लुकतुके
इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत तीनही सामन्यात भारताकडून के एल राहुलने यष्टीरक्षण केलं. त्यामुळे डावखुरा यष्टीरक्षक रिषभ पंतला संघाबाहेर बसावं लागलं. अगदी मालिका जिंकलेली असताना तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी संघात दोन बदल झाले पण, रिषभ पंतला खेळण्याची संधी मिळाली नाही. आता भारताने ही मालिका ३-० अशी जिंकल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने रिषभ पंतविषयीची भूमिका रोखठोकपणे सांगितली आहे. ‘के एल राहुल हा एकदिवसीय संघासाठी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून पहिली निवड असेल,’ असं गंभीर म्हणाला. (Ind vs Eng, 3rd ODI)
(हेही वाचा- पीएमएलएचा अर्थ एखाद्याला केवळ तुरुंगात ठेवणे हा नाही, Supreme Court ने ED ला सुनावलं)
राहुल या मालिकेत सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. पहिल्या दोन सामन्यात तो फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. पण, तिसऱ्या सामन्यात त्याला जास्त चेंडू खेळण्याची संधी मिळाली. आणि यात त्याने मौल्यवान ४० धावा केल्या. ‘के एल हाच आमचा सर्वोत्तम यष्टीरक्षक फलंदाज आहे. रिषभने काहीही चुकीचं केलेलं नाही. त्याला त्याची संधी मिळेल. पण, सध्या राहुलवर आमची भिस्त आहे. आणि संघात दोन यष्टीरक्षक फलंदाज असू शकत नाहीत,’ अशा थेट शब्दात गंभीरने पत्रकारांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. (Ind vs Eng, 3rd ODI)
Captain @ImRo45 is presented the winners trophy by ICC Chairman, Mr @JayShah as #TeamIndia clean sweep the ODI series 3-0 👏👏
#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/1XaKksydw9
— BCCI (@BCCI) February 12, 2025
‘आम्ही संघ निवड करताना सरासरी आणि इतर आकडेवारी पाहत नाही. संघासाठी कोण कोणत्या वेळी योग्य कामगिरी निभावू शकेल, याचा अंदाज आम्ही घेत असतो,’ अशी भूमिका गंभीरने यावेळी मांडली. भारतीय संघ १५ फेब्रुवारीला दुबईसाठी रवाना होईल. तिथे चॅम्पियन्स करंडकाचे भारतीय संघाचे सामने २० तारखेपासून सुरू होतील. त्यापूर्वी संघाची रचना कशी असेल याविषयीचं कुतुहल पत्रकारांच्या प्रश्नातून डोकावत होतं. आणि गंभीरने एकाही प्रश्नाला बगल दिली नाही. मालिका संपल्यानंतर तो स्वत: पत्रकार परिषदेसाठी आला. अगदी यशस्वी जयसवालच्या डच्चूबद्दलही तो खुलेपणाने बोलला. (Ind vs Eng, 3rd ODI)
‘यशस्वीला पुढेही संधी मिळेल. त्याचं वय अजून लहान आहे. पण, आता संघ निवडताना आम्हाला प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज बाद करू शकेल असा पर्याय हवा होता. आणि त्याचं उत्तर वरुण चक्रवर्तीमध्ये आम्हाला सापडलं. आम्ही गोलंदाज शोधत होतो,’ असं गंभीर म्हणाला. (Ind vs Eng, 3rd ODI)
𝐂𝐋𝐄𝐀𝐍 𝐒𝐖𝐄𝐄𝐏
Yet another fabulous show and #TeamIndia register a thumping 142-run victory in the third and final ODI to take the series 3-0!
Details – https://t.co/S88KfhFzri… #INDvENG @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ZoUuyCg2ar
— BCCI (@BCCI) February 12, 2025
जसप्रीत बुमराहच्या तंदुरुस्तीविषयी मात्र त्याने काहीही उत्तर दिलं नाही. ते काम बीसीसीआयच्या वैद्यकीय चमूचं आहे, इतकंच तो म्हणाला. बुमराह खेळण्यासाठी उपलब्ध नाही, एवढंच आम्हाला माहीत आहे, असं त्याचं म्हणणं होतं. शुभमन गिल फॉर्ममध्ये परतल्यामुळे त्याने समाधान व्यक्त केलं. (Ind vs Eng, 3rd ODI)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community