भारतात पहिल्यांदाच वंचित आणि दुर्बल घटकांसाठी थेट कायदेशीर मदत पुरवण्यासाठी ‘लीगल एड ऑन व्हील्स’ (Legal Aid on Wheels) या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन बॉम्बे उच्च न्यायालयाचे (Bombay High Court) माननीय न्यायमूर्ती मकरंद सुभाष कर्णिक यांच्या हस्ते होणार असून, भारत सरकारचे उपसॉलिसिटर जनरल अॅड. प्रवीण एन. फळदेसाई हे देखील या प्रसंगी उपस्थित रहाणार आहेत. १५ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ९:३० वाजता मुंबई विद्यापिठाच्या (Mumbai University) कॉन्वोकेशन हॉलमध्ये या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे.
(हेही वाचा – ‘… हाच युद्ध जिंकण्याचा अंतिम उपाय नव्हे’ ; भविष्यातील युद्धांसंबंधी ‘सीडीएस’ General Anil Chauhan काय म्हणाले ?)
वंचितांसाठी वकील दारात येणार
‘लीगल एड ऑन व्हील्स’ अंतर्गत कायद्याचे जाणकार थेट गरजूंपर्यंत पोहोचून मोफत सल्ला आणि कायदेशीर मदत पुरवली जाणार आहे. यामुळे न्यायाची प्रक्रिया वेगवान आणि अधिक सुलभ होणार आहे. उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कायदेशीर प्रकरणांचा अनुभव, ज्येष्ठ न्यायाधीश आणि विधिज्ञांसोबत संवाद, तसेच विनामूल्य प्रशिक्षण मिळणार आहे. त्यामुळे भविष्यातील जबाबदार वकील घडवण्यासाठी हा प्रकल्प मोलाचा ठरणार आहे.
काय आहे ‘दर्द से हमदर्द तक’ ?
‘दर्द से हमदर्द तक ट्रस्ट’ (DARD SE HUMDARD TAK) गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी कार्यरत आहे. आतापर्यंत १००+ वकिलांना आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, ८००+ वंचित नागरिकांना मोफत कायदेशीर मदत (Free legal aid), आणि ५०+ सेमीनार आणि वेबीनार आयोजित करण्यात आले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community