रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सरकारी व्यवहार करणाऱ्या सर्व बँकांना ३१ मार्च २०२५ ला बँका (Banking) सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. ३१ मार्च रोजी रमजान ईद (Eid holiday) असल्याने यादिवशी सार्वजनिक सुट्टी असते. पण आर्थिक व्यवहारातील (financial year) गोंधळ टाळण्यासाठी आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. (RBI)
हेही वाचा-AI तंत्रज्ञान आधारित प्रणालीमुळे राज्यात दुसरी निल क्रांती ; मंत्री Nitesh Rane यांचे वक्तव्य
रमजान ईद (Eid holiday) निमित्त हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) आणि मिझोराम (Mizoram) वगळता सर्व राज्यांमध्ये ३१ मार्च रोजी बँक हॉलिडे (Bank Holiday) जाहीर करण्यात आला होता. ३१ मार्च २०२५ रोजी संपणाऱ्या २०२४-२५ या आर्थिक वर्षात पावत्या आणि देयकांसह सर्व सरकारशी संबंधित आर्थिक व्यवहारांचा योग्य हिशेब करण्यासाठी या दिवसाची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. (RBI)
हेही वाचा-Chandrapur Cyber Crime : चंद्रपूर जिल्हा बँकेवर सायबर हल्ला; ३ कोटी ७० लाख लंपास
३१ मार्च रोजी सरकारचे आर्थिक वर्ष संपते. म्हणजेच सरकारी महसूल, देयके आणि सेटलमेंटशी संबंधित सर्व व्यवहार नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी करणे आवश्यक असतं. १ एप्रिल (मंगळवार) रोजी मेघालय, छत्तीसगड, मिझोराम, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश आणि मेघालय वगळता बुहतेक केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत. (RBI)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community