Virat Kohli : विराट कोहलीच्या इंग्लंडविरुद्ध ४,००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण, सचिनला टाकलं मागे

Virat Kohli : विराटने ३ संघांविरुद्ध अशी कामगिरी केली आहे.

30
Virat Kohli : विराट कोहलीच्या इंग्लंडविरुद्ध ४,००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण, सचिनला टाकलं मागे
  • ऋजुता लुकतुके

विराटला (Virat Kohli) किंग कोहली का म्हणतात हे त्याच्या आकडेवारीने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. अहमदाबादमध्ये त्याने थोड्या प्रमाणात धावांचा दुष्काळही संपवला आहे आणि फॉर्ममध्ये पुनरागमन करताना ५७ चेंडूंत ५२ धावांची खेळी केली. यात त्याने १ षटकार आणि ७ चौकार लगावले. या खेळीदरम्यान त्याने कारकीर्दीतील आणखी एक महत्त्वाचा मापदंड सर केला. अहमदाबादमध्ये सामन्याच्या दुसऱ्याच षटकांत विराट मैदानावर आला आणि नेहमीपेक्षा वेगळ्या धाटणीचे फटके लगावत त्याने अर्धशतक झळकावलं. विराट (Virat Kohli) आपल्या फलंदाजीवर मेहनत घेत आहे आणि चॅम्पियन्स करंडकात त्याच्याकडून भारताला आशा आहेत. त्यापूर्वी अहमदाबादमध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध ४,००० धावांचा टप्पा ओलांडला.

सुरुवातीला मार्क वूडने विराट कोहलीला (Virat Kohli) थोडा त्रास दिला, पण विराटने संयमाने फलंदाजी केली. त्यानंतर मात्र शुभमनबरोबर ९६ चेंडूंमध्ये शतकी भागीदारी केली. आणि भारतीय डावाची पायाभरणी केली.

(हेही वाचा – CM Devendra Fadnavis : राज्यसेवेतील अधिकाऱ्यांच्या आर्थिक मागण्यांसाठी महासंघाने मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले)

जम बसलेल्या विराटला (Virat Kohli) आदिल रशीदच्या एका लेगस्पिन चेंडूने चकवलं. विराट कोहली ११ सामन्यांत पाचव्यांदा आदिल रशीदचा बळी ठरला.

विराट कोहलीने (Virat Kohli) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीत शतक केलं होतं. त्यानंतरच्या १० डावांमध्ये त्याच्या हातून मोठी धावसंख्या झाली नव्हती. त्यामुळे अहमदाबादच्या खेळीला विशेष महत्त्व आहे.

याच सामन्यात त्याने एक विक्रम नावावर केला आहे. इंग्लिश संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४,००० धावा करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. यादरम्यान विराटने (Virat Kohli) सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. याआधी, सचिन तेंडुलकर हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा भारतीय होता. तेंडुलकरने इंग्लंडविरुद्ध ३,९९० धावा केल्या. आता विराट कोहलीने आघाडी घेतली आहे.

(हेही वाचा – JPC report on Waqf : वक्फ विधेयकावरील अहवाल सादर करतांना विरोधकांचा गोंधळ; सभापतींनी सुनावले खडे बोल)

४००० – विराट कोहली*
३९९० – सचिन तेंडुलकर
२९९९ – एमएस धोनी
२९९३ – राहुल द्रविड
२९१९ – सुनील गावस्कर
2460 – रोहित शर्मा

विराट कोहलीने (Virat Kohli) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या संघाविरुद्ध ४००० धावा पूर्ण केल्या. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३ वेगवेगळ्या संघांविरुद्ध ४००० धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू बनला आहे. इंग्लंडपूर्वी त्याने ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरुद्ध हा पराक्रम केला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.