Rajan Salvi यांनी सांगितले शिवसेना उबाठा सोडण्यामागचे कारण; ‘या’ नेत्याचे घेतले नाव

344

शिवसेना उबाठा गटाचे (Shivsena UBT Group) राजन साळवी यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला असून, १३ फेब्रुवारी रोजी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (Shivsena) पक्षात सामील होणार आहेत. तत्पूर्वी शिवसेना उबाठा गट का सोडला? कुणामुळे सोडला? यांचे कारण सांगितले आहे. यामध्ये उबाठा गटातील एका बड्या नेत्याचेही नाव घेतले आहे. (Rajan Salvi)

राजन साळवी शिवसेना उबाठा गट सोडण्यामागचे कारण सांगितले असून, २०२४ चा पराभव माझ्या जिव्हारी लागला असल्याचे साळवी म्हणाले. या निवडणुकीत माझ्या पक्षातीलच नेत्यांनी माझ्या विरुद्ध काम केले. विनायक राऊत (Vinayak Raut) हेच माझ्या पराभवाला कारणीभूत आहेत. त्यांच्यामुळे मी पक्ष सोडत आहे, असे साळवी यांनी गुरुवार, १३ फेब्रुवारी रोजी जाहीर केले. विनायक राऊत यांनी माझ्याविरोधात काम केल्याचा गंभीर आरोप साळवी यांनी केला आहे.

(हेही वाचा – Accident News : भरधाव कार ट्रॉलीवर आदळून भीषण अपघात; चार मित्रांचा दुर्दैवी अंत, तिघे जखमी)

विनायक राऊत म्हणतात उदय सामंत (Uday Samant) यांना शह देण्यासाठी राजन साळवींना घेतलय. त्यावर राजन साळवी म्हणाले की, “शह-काटशह असं काही नाहीय. हातात हात घालून शिवसेना वाढवण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. 38 वर्ष राजन साळवीने शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशाच पालन केलं आहे”

विनायक राऊतांवर तुमची नाराजी आहे का? या प्रश्नावर ते म्हणाले की, “विनायक राऊतांबद्दल नाराजी आहे, त्याची तक्रार मी उद्धव ठाकरेंकडे (Uddhav Thackeray) केली. ही वस्तुस्थिती आहे, पक्ष सोडण्याच्या निर्णयाप्रत मी आलो” भाजपा ऐवजी शिवसेनेत जाण्याचा निर्णय का घेतला? त्यावर ते म्हणाले की, “महाराष्ट्रात सत्तेच्या अनुषंगाने तीन पक्ष महत्त्वाचे आहेत. भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस. आम्ही शांतपणे विचार केला. पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या सूचनेनुसार वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कुठे आहेत? धनुष्यबाण कुठे आहे? हा विचार केला. आमचा निर्णय योग्य आहे. योग्यवेळी योग्य निर्णय घेईन असं म्हटलं होतं, त्यानुसार निर्णय घेतला. 

(हेही वाचा – Ind vs Eng, 3rd ODI : वरुण चक्रवर्ती इंग्लंडविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना का खेळला नाही?)

विधान परिषदेवर जाण्याची इच्छा आहे का?

विधान परिषदेवर जाण्याची इच्छा आहे का? यावर राजन साळवी म्हणाले की, “मी अनेक पदांवर काम केलं आहे. माझ्या नावासमोर तीनदा आमदार लागलं. मी एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबात गेलो आहे. ते ठरवतील, त्यांच्यावर विश्वास आहे. त्यांनी मोठ्या भावासारखं प्रेम द्यावं” अशी अपेक्षा व्यक्त केली. 

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.