Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकासाठी कशी असेल भारतीय जर्सी?

Champions Trophy 2025 : ही स्पर्धा आता एका आठवड्यावर येऊन ठेपली आहे.

56
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकासाठी कशी असेल भारतीय जर्सी?
  • ऋजुता लुकतुके

आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेपूर्वी सगळीकडे चर्चा असते ती संघांच्या जर्सीची. जर्सीचे रंग, त्यावरील पॅटर्न आणि तिचे प्रायोजक त्यानुसार किमतीत होणारा बदल अशी जोरदार चर्चा चाहत्यांमध्ये रंगत असते. भारताच्या निळ्याशार रंगातील जर्सीचं अनावरण बीसीसीआयचे माजी सचिव जय शाह यांनी अलीकडेच केलं आहे आणि बीसीसीआयने तो व्हिडिओही आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. पण, खेळाडूंनी अजून चॅम्पियन्स करंडकासाठीच्या जर्सीत फोटो-शूट केलेलं नाही. पण, भारताची निळीशार जर्सी तयार आहे. भारतीय जर्सीत निळ्या आणि भगव्या रंगाचा मिलाफ आहे आणि खेळाडूच्या छातीवर डाव्या बाजूला तिरंगा कोरलेला असेल. आदिदास हे भारतीय जर्सीचे प्रायोजक आहेत. त्यांनी भारतीय खेळाडूंच्या क्रमांकाच्या जर्सी यापूर्वीच बाजारात आणल्या आहेत. यात विराट कोहली आणि रोहित शर्माच्या जर्सींना सर्वाधिक मागणी आहे. (Champions Trophy 2025)

(हेही वाचा – Ind vs Eng, 3rd ODI : भारत आणि इंग्लंडचे संघ अहमदाबादमध्ये हिरवी फित घालून का खेळले?)

बीसीसीआयने नवीन वनडे जर्सी जाहीर केली असली तरी चॅम्पियन्स करंडकाची अधिकृत जर्सी लाँच केलेली नाही. आयसीसी वेबसाइटवर भारतीय संघाच्या चॅम्पियन्स करंडकाच्या जर्सीची किंमत ४,५०० भारतीय रुपये आहे. भारताच्या नवीन वनडे जर्सीची किंमत ५,९९९ रुपये आहे.

चॅम्पियन्स करंडक २०२५ची जर्सी यजमान पाकिस्तानने जारी केली आहे. पाकिस्तानने स्पर्धेच्या जर्सीची किंमत ४० अमेरिकन डॉलर (सुमारे ३,५०० भारतीय रुपये) ठेवली आहे.

चॅम्पियन्स करंडकाची जर्सीही अफगाणिस्तानने जाहीर केली आहे. आयसीसीच्या वेबसाइटवर अफगाणिस्तानच्या जर्सीची किंमत सुमारे ४,५०० भारतीय रुपये ठेवण्यात आली आहे. (Champions Trophy 2025)

(हेही वाचा – Accident News : भरधाव कार ट्रॉलीवर आदळून भीषण अपघात; चार मित्रांचा दुर्दैवी अंत, तिघे जखमी)

चॅम्पियन्स करंडकात सहभागी होणाऱ्या ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या संघांनी अद्याप अधिकृतपणे जर्सी जाहीर केलेली नाहीत. मात्र, या संघांच्या जर्सी आयसीसीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत. सर्व जर्सींची किंमत सुमारे ४,५०० भारतीय रुपये आहे. आता सर्व संघ अधिकृतपणे जर्सी कधी जाहीर करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. (Champions Trophy 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.