Congress खासदाराच्या पत्नीचा आयएसआयशी संबंध; आसामच्या मुख्यमंत्र्यांचा आरोप

50
Congress खासदाराच्या पत्नीचा आयएसआयशी संबंध; आसामच्या मुख्यमंत्र्यांचा आरोप
Congress खासदाराच्या पत्नीचा आयएसआयशी संबंध; आसामच्या मुख्यमंत्र्यांचा आरोप

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस (Congress) नेते गौरव गोगोई यांच्यावर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस (Congress) खासदाराचे नाव न घेता, त्यांनी त्यांच्या पत्नीच्या नागरिकत्वाबद्दल आणि आयएसआयशी तिच्या संबंधांसंदर्भात आरोप केले आहेत.

( हेही वाचा : ३१ मार्चला सर्व बँका सुरू राहणार; RBI चा निर्णय

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी ‘एक्स’वर लिहले की, “आयएसआयशी (ISI) संबंधाचा आरोप, ब्रेनवॉशिंग आणि पाकिस्तानी दूतावासात तरुणांना कट्टरपंथी बनवण्याचा आरोप, तसेच गेल्या १२ वर्षांपासून भारतीय नागरिकत्व न घेण्याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली पाहिजेत. शिवाय, धर्मांतर कार्टेलशी हातमिळवणी करण्याचा आणि देशाची सुरक्षा अस्थिर करण्यासाठी जॉर्ज सोरोससह (George Soros) इतरांकडून पैसे घेणे, या चिंताग्रस्त बाबींकडे दुर्लक्षित करता येणार नाही, असे ही सरमा म्हणाले. (Congress)

हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी ते काँग्रेस खासदार गौरव गोगोई (Gaurav Gogoi) आणि त्यांच्या पत्नी एलिझाबेथ कोलबर्न यांच्याबद्दल बोलत होते हे स्पष्ट आहे. दोघांचेही २०१३ मध्ये लग्न झाले. लग्नाला बारा वर्ष होऊनही, कोलबर्न अजूनही ब्रिटिश पासपोर्ट वापरत आहेत. त्यांनी अद्याप भारतीय नागरिकत्व स्वीकारलेले नाही. (Congress)

हिमंत बिस्वा सरमा यांनी आरोप केला की, एका खासदाराच्या पत्नीला अनेक वर्षांपासून परदेशी नागरिकत्व सुरु ठेवण्यास का परवानगी देण्यात आली? राजकारण्यांना वेगळे नियम नाहीत. तसेच त्यांनी आयएफएस अधिकाऱ्यांच्या परदेशी नागरिकांशी लग्नाबाबतच्या नियमांबद्दल सांगितले. याअंतर्गत, त्यांना परवानगी घ्यावी लागेल आणि त्यांच्या जोडीदाराला ६ महिन्यांच्या आत नागरिकत्व मिळवावे लागेल.

गोगोई यांच्या पत्नी एलिझाबेथ सध्या हवामानविषयक समस्यांवर काम करणाऱ्या ऑक्सफर्ड पॉलिसी मॅनेजमेंटमध्ये काम करत आहेत. त्या दिल्लीतील क्लायमेट अँड डेव्हलपमेंट नॉलेज नेटवर्क (CDKN) मध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणूनही काम करतात. आसामचे मुख्यमंत्री सोशल मीडियावर त्यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांचा संदर्भ देत होते. या आरोपांनुसार, एलिझाबेथ अली सीडीकेएनचे आशिया संचालक तौकीर शेख (Tauqir Sheikh) यांच्यामार्फत आयएसआयशी संबंधित आहेत? त्यांनी पाकिस्तानच्या नियोजन आयोगातही काम केले आहे. एलिझाबेथने पाकिस्तानमध्ये तौकीर शेख यांच्यासोबत जवळून काम केले, असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केले. (Congress)

हेही पाहा  :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.