भाजपाच्या Chitra Wagh यांची आदित्य ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाल्या, दिल्लीत हुजरेगिरी…

74
भाजपाच्या Chitra Wagh यांची आदित्य ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाल्या, दिल्लीत हुजरेगिरी…
भाजपाच्या Chitra Wagh यांची आदित्य ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाल्या, दिल्लीत हुजरेगिरी…

भाजपाच्या विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी आदित्य ठाकरेंचा खरपूस समाचार घेतला आहे. दरम्यान, १२ फेब्रुवारी रोजी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray Delhi visit) हे दिल्ली येथे जाऊन कॉंग्रेसच्या नेत्यांपुढे हुजरेगिरी केल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी एक्सच्या माध्यमातून केला आहे. तसेच आपले आजोबा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण ठेवण्याचा उपरोधिक सल्ला दिला ही चित्रा वाघ यांनी दिला. (Chitra Wagh)

(हेही वाचा – CM Devendra Fadnavis : राज्यसेवेतील अधिकाऱ्यांच्या आर्थिक मागण्यांसाठी महासंघाने मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले)

शिवसेना उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरे दिल्लीच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. त्यांनी बुधवारी रात्री उशिरा काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतली. त्यानंतर गुरुवारी त्यांनी आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची भेट घेतली. या भेटीद्वारे ते पुन्हा एकदा विरोधकांच्या इंडि आघाडीची (India Alliance) मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी त्यांच्यावर एक्सच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.

आजोबांचे तरी स्मरण ठेवा रे…

चित्रा वाघ गुरुवारी आपल्या एका एक्सपोस्टमध्ये म्हणाल्या की, ज्यांच्या आजोबांना नेते ‘मातोश्री’वर भेटायला यायचे, त्यांचा नातू मात्र दिल्लीत जाऊन चरणस्पर्श करतोय..! मराठी अस्मितेचा हा अपमान नाही का..? संजय राऊत (Sanjay Raut) रोज पत्रकार परिषद घेऊन मोठमोठ्या गर्जना करतात, पण आदित्य ठाकरेंच्या दिल्लीतल्या हुजरेगिरीवर गप्प का? की यावरही काहीतरी चमत्कारिक स्पष्टीकरण येणार का..!

(हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहलीच्या इंग्लंडविरुद्ध ४,००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण, सचिनला टाकलं मागे)

आम्ही दिल्लीत कुणापुढे झुकत नाही म्हणणारे आदित्य ठाकरे थेट दिल्लीत (Delhi) जाऊन राहुल गांधींची हुजरेगिरी करत आहेत! महाराष्ट्रात स्वाभिमानाच्या गप्पा आणि दिल्लीत चरणस्पर्श – हीच का ठाकरे गटाची नवी परंपरा..? आजोबांचे तरी स्मरण ठेवा रे, असे चित्रा वाघ यांनी एक्सच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.