![Waqf Board च्या माजी अध्यक्षांची घोषणा; हिंदू धर्मात घरवापसी करणाऱ्यांना दरमहा ३ हजार रुपये देणार... Waqf Board च्या माजी अध्यक्षांची घोषणा; हिंदू धर्मात घरवापसी करणाऱ्यांना दरमहा ३ हजार रुपये देणार...](https://www.marathi.hindusthanpost.com/wp-content/uploads/2025/02/Jitendra-Narayan-Singh-Tyagi-696x377.webp)
उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभात देश विदेशातून करोडो भाविक त्रिवेणी संगमात अमृतस्नान करण्यासाठी येत आहेत. त्यात वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी (Wasim Rizvi) यांनी महाकुंभात स्नान केले. तसेच त्यांनी एक घोषणा केली. रिझवी म्हणाले की, इस्लाम धर्मांतून सनातन हिंदू (Hindu) धर्मात घरवापसी करणाऱ्यांना दरमहा तीन हजार रुपये देणार आहे. त्यामुळे रिझवी यांनी अशी घोषणा केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. (Waqf Board)
( हेही वाचा : J. J. Flyover खालील जागेचे सुशोभीकरण; महापालिका आयुक्तांनी दिले ‘हे’ आदेश…)
उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी म्हणजेच आत्ताचे जितेंद्र नारायण सिंह त्यागी (Jitendra Narayan Singh Tyagi) यांनी काही वर्षांपूर्वीच इस्लाम धर्म सोडून सनातन हिंदू (Hindu) धर्म स्वीकारला होता. घरवापसीनंतर त्यांनी त्यांचे नामकरण जितेंद्र नारायण सिंह त्यागी (Jitendra Narayan Singh Tyagi) असे केले. जुना आखाड्याचे महामंडलेश्वर नरसिंहानंद गिरी महाराज यांच्या उपस्थितीत त्यांची घरवापसी करण्यात आली. रिझवी यांच्या मते, त्यांनी यापूर्वी केलेल्या विधानांमुळे त्यांना इस्लाम (Islam) धर्मातून बाहेर फेकण्यात आले. त्यानंतर कोणता धर्म स्विकारायचा हे त्यांच्या हाती होते. परंतु त्यांनी अखेर सनातन धर्मात (Sanatan Dharma) घरवापसी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विधिवत पद्धतीने त्यांची घरवापसी करण्यात आली. (Waqf Board)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community