पुण्यातील (Pune) मेजर शंतनू घाटपांडे (Major Shantanu Ghatpande) हे ५ बटालियन -९ गुरखा रायफल्सच्या माध्यमातून सैन्यदलात सेवा बजावत आहेत. त्यांच्या साहसी कामगिरीसाठी दि. १२ फेब्रुवारी रोजी त्यांना रांची (Ranchi) येथे झालेल्या एका कार्यक्रमात सेना मेडल (गॅलंट्री) (Army Medal) देऊन सन्मानित केले आहे. मणिपूर (Manipur) राज्यामध्ये त्यांनी केलेल्या यशस्वी दहशतवादविरोधी अभियानासाठी हा पुरस्कार देण्यात आला. मागील २ वर्षांपासून ते मणिपूर (Manipur) येथे दहशतवादविरोधी अभियानामध्ये मोलाची भूमिका बजावत आहेत. (Major Shantanu Ghatpande)
( हेही वाचा : BJP च्या संघटन पर्वासाठी प्रदेशाध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्ष राज्यभर दौऱ्यावर)
अशी केली देशसेवा !
४ ऑक्टोबर २०२३ या दिवशी मेजर शंतनु मणिपूरमध्ये एका संवेदनशील गावात कर्तव्यावर होते. त्याचवेळी विद्रोह्यांनी त्या गावावर हल्ला केला. त्यावेळी त्यांनी दहशतवाद्यांच्या गोळीबाराचा सामना केला. त्यामुळे दहशतवाद्यांना पळून जाणे भाग पडले. (Indian Army)
७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी दहशतवाद्यांनी पुन्हा गाव जाळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पुन्हा अद्वितीय साहस आणि कुशल नेतृत्वाचे प्रदर्शन करत मेजर शंतनू यांनी त्यांचे कारस्थान हाणून पाडले. ९ डिसेंबर २०२३ या दिवशी दोन मोठ्या मोहिमांमध्ये दहशतवाद्यांनी लपवलेली युद्धसामग्री जप्त करण्यात भारतीय सेनेला यश मिळाले. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी मेजर शंतनू यांनी दाखवलेले अगम्य साहस आणि कुशल नेतृत्व यांसाठी मेजर शंतनू घाटपांडे यांना सेना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. (Major Shantanu Ghatpande) (Indian Army)
हेही पाहा :