-
प्रतिनिधी
पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एकाची निर्घृणपणे हत्या (Murder) करणाऱ्या दोघांना सत्र न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ही हत्या जून २०२१ मध्ये काळाचौकी अभ्युदय नगर येथे घडली होती. न्यायालयाने या दोघांना सश्रम कारवासासह दोन हजार रुपयांचा दंड आणि दंड नाही भरल्यास आणखी ४ महिन्यांच्या कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
(हेही वाचा – ‘तिकडे लागली वाळवी, म्हणून इकडे आले साळवी; Rajan Salvi यांच्या पक्षप्रवेशावेळी एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका)
चेतन बाळू तिकोने (३५) आणि अक्षय दत्ताराम गायकवाड (३०) असे जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघे काळाचौकी अभ्युदय नगर येथे राहण्यास आहे. चेतन तिकोनेच्या पत्नीसोबत मृत व्यक्ती विकास पासी (२०) याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय चेतनला होता. या संशयातून १६ जून २०२१ रोजी चेतन याने मित्र अक्षय गायकवाडच्या मदतीने विकास पासी याची निर्घृणपणे हत्या (Murder) केली होती. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून २४ तासांत दोन्ही आरोपींना अटक केली होती. या गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक प्रवीण कुयेस्कर यांनी या गुन्ह्यातील आरोपी विरुद्ध भक्कम पुरावे तयार करून साक्षीदारांची साक्ष, घटनेत वापरले हत्यार जप्त करण्यात आले होते.
(हेही वाचा – पुण्यातील Major Shantanu Ghatpande यांचा ‘सेना मेडल’ पुरस्काराने सन्मान)
या गुन्ह्याचे आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले होते. या हत्येचा खटला सत्र न्यायालयातील न्यायाधीश एन. पी. त्रिभुवन यांच्या न्यायालयात सुरू होता. सरकारी अभियोक्ता म्हणून रंजना बुधवंत यांनी सरकारी पक्षातर्फे बाजु मांडली. आरोपी विरुद्ध असलेले सबळ पुरावे १६ साक्षीदारांचे जबाब तपासण्यात आले. आरोपी चेतन बाळू तिकोने (३५) आणि अक्षय दत्ताराम गायकवाड (३०) यांच्या विरुद्ध असलेल्या पुराव्यावरून दोन्ही आरोपींना दोषी ठरविण्यात आले असून दोघांना जन्मठेपेची सश्रम कारवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. (Murder)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community