-
प्रतिनिधी
राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी गुरुवारी वढू बुद्रुक येथे जाऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाला अभिवादन केले. तसेच, या स्मारकाच्या विकासकामांचा आणि पुणे जिल्ह्यातील अन्य राज्य संरक्षित स्मारकांच्या प्रगतीचा आढावा घेतला.
मंत्री शेलार (Ashish Shelar) यांनी पुरातत्व विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेऊन वढू बुद्रुकसह तोरणा, राजगड आणि अन्य स्मारकांच्या डागडुजीसंबंधी चर्चा केली. या बैठकीस पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, सहाय्यक संचालक विलास वहाणे, स्मारक समितीचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
(हेही वाचा – Murder : काळाचौकी हत्या प्रकरण; दोघांना जन्मठेपेची शिक्षा)
राज्य शासनाने वढू बुद्रुक येथील संभाजी महाराज समाधी स्थळ संरक्षित केले असून, त्याच्या विकासासाठी विविध योजनांवर काम सुरू आहे. यासोबतच, पुण्यातील 39 राज्य संरक्षित स्मारकांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी मंत्री शेलार (Ashish Shelar) यांनी पुरातत्व विभागाच्या कार्यालयात विशेष बैठक घेतली.
याआधी आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी पंढरपूर आणि तुळजापूर येथे जाऊन मंदिरांच्या विकासकामांचा आढावा घेतला होता. शुक्रवारी (14 फेब्रुवारी) पंढरपूर आणि तुळजापूर येथे होणाऱ्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community