![२०१९ च्या निवडणुकीत USAID ने भाजपाला हरवण्यासाठी पैसे दिले; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याचा मोठा खुलासा २०१९ च्या निवडणुकीत USAID ने भाजपाला हरवण्यासाठी पैसे दिले; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याचा मोठा खुलासा](https://www.marathi.hindusthanpost.com/wp-content/uploads/2025/02/USAID-696x377.webp)
भाजपा (BJP) खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी अलीकडेच अमेरिकन ‘यूएसएआयडी’ (USAID) वर गंभीर चर्चा केली आहे. त्यांनी दावा केला की, अमेरिकन संस्था यूएसएआयडी (USAID) कडून भारताचे तुकडे करण्यासाठी विविध संस्थांना निधी दिला आहे. तसेच याप्रकरणी दोषी आढळणाऱ्या लोकांना तुरूंगात टाकावे, अशी मागणी दुबे यांनी सरकारकडे केली आहे. यावेळी काँग्रेसचे अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरोस (George Soros) यांच्याशी संबंध असल्याचा आरोपीही दुबे यांनी केला. त्यातच आता अमेरिकेचे माजी अधिकारी माइक बेंज यांच्या अलिकडच्या खुलाशांमुळे दुबेंचा दावा आणखी मजबूत झाला आहे.
हेही वाचा : छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळ विकासाचा मंत्री Ashish Shelar यांच्याकडून आढावा
अमेरिकन अधिकारी माइक बेंज यांचा मोठा खुलासा
अमेरिकेचे माजी परराष्ट्र विभागाचे अधिकारी माइक बेंज (Mike Benz) यांनी पुढे सांगितले की, अमेरिका भारत आणि बांगलादेशसह अनेक देशांसोबत आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या संवाद साधत आहे. ते म्हणाले की, अमेरिका मीडिया प्रभाव, सोशल मीडिया सेन्सॉरशिप आणि विरोधीपक्ष आर्थिक मदतीच्या आधारे इतर देशात राजकीय वातावरण निर्माण करत आहेत. (USAID)
तसेच बेंजने असा दावा केला आहे की, अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणामुळे या घोटाळ्यात यूएसएआयडी, थिंक टँक आणि प्रमुख तंत्रज्ञान कंपन्या सामील झाल्या आहेत. या कंपन्यांनी २०१९ ला भारतातील लोकसभेच्या निवडणुका प्रभावित करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच त्यांनी दावा केला की, अमेरिकी संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या विरोधात निवडणुकीत नॅरेटिव्ह पसरवण्यासाठी विरोधी पक्षांची मदत केली. (USAID)
सोशल मीडियावरील दबावाला प्रतिसाद
बेंज (Mike Benz) म्हणाले की, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने फेसबुक, व्हॉट्सअॅप, यूट्यूब आणि ट्विटर सारख्या मोठ्या टेक कंपन्यांवर प्रभाव टाकून मोदी समर्थक कंटेंटला आळा घालण्याचा प्रयत्न केला. जानेवारी २०१९ मध्ये मेसेज फॉरवर्डिंगची मर्यादा कमी करण्याच्या व्हॉट्सअॅपच्या धोरणाला भाजपाचे डिजीटल प्रसारण रोखण्याचे उदाहरण असल्याचे बेंज यांनी सांगितले. मोदी समर्थकांना बनावट बातम्या पसरवण्याच्या संदर्भात फसवले गेल्याचे आणि भारतातील डिजिटल जगात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती ही बेंज यांनी दिली. बेंज यांनी असा दावा केला की, त्यांनी असे निरीक्षण केले आहे की, यूएसएआयडीच्या आउटरीच संस्थेने आंतरराष्ट्रीय मीडिया आणि डिजिटल फॉरेन्सिक्स (Digital forensics) गटांसह भारतातून प्रसारित होणारी माहिती धोक्याची घंटा असल्याचे सांगत संभ्रम निर्माण केला, असे ही बेंज म्हणाले. (USAID)
Join Our WhatsApp Community