-
ऋजुता लुकतुके
स्टार तेज गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) चॅम्पियन्स करंडकात (Champions Trophy) खेळणार नसल्याचं स्पष्ट झाल्यावर त्याने बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतून आपला पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिथे बुमराहने जिममध्ये आपला सराव सुरू केला आहे. आणि हा फोटोही तिथलाच आहे. बुमराहने (Jasprit Bumrah) आरशात पाहतानाचा सेल्फी शेअर केला आहे. आणि त्यावर फक्त एका शब्दात मथळा दिला आहे, ‘तयारी सुरू!’ बुमराहने जिमचेच कपडे घातले आहेत.
बीसीसीआयने (BCCI) मंगळवारी रात्री बुमराह (Jasprit Bumrah) चॅम्पियन्स करंडक (Champions Trophy) खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं. गोलंदाजीच्या अतिरिक्त ताणामुळे त्याची पाठ दुखावली आहे. सध्या बंगळुरूत क्रिकेट अकादमीत तो तंदुरुस्तीसाठी दाखल झाला आहे. त्याच्या ऐवजी भारतीय संघात हर्षित राणाचा (Harshit Rana) समावेश करण्यात आला आहे.
(हेही वाचा – Mumbai 26/11 attacks : मुंबई हल्ल्यातील दहशतवादी तहव्वूर राणाला भारताकडे सोपवणार; ट्रम्प यांची घोषणा)
View this post on Instagram
(हेही वाचा – राज्यात दीड लाख पदांची विक्रमी भरती; CM Devendra Fadnavis यांची माहिती)
जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) गोलंदाजीच्या विशिष्ट शैलीमुळे त्याच्या शरीराला गोलंदाजीचा अतिरिक्त ताण झेपत नाही. त्यामुळे त्याला जपावं लागतं. यापूर्वी २०२२ मध्ये बुमराहला पहिल्यांदा पाठदुखीचा त्रास झाला तेव्हा हे समोर आलं होतं. बीसीसीआयने (BCCI) त्याला घाई घाईने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टी-२० विश्वचषकासाठी पाठवलं. पण, त्यामुळे त्याच्या दुखापतीने उचल खाल्ली. आणि नंतर तो वर्षभर क्रिकेटपासून दूर राहिला. अखेर न्यूझीलंडमध्ये त्याला शस्त्रक्रियेसाठी जावं लागलं.
तेव्हापासून बीसीसीआय (BCCI) त्याच्या दुखापतीविषयीचा सल्ला न्यूझीलंडच्या डॉक्टरकडून वेळोवेळी घेत असतं. त्याला कसोटींत जपून वापरण्याचा सल्लाही संघ प्रशासनाला देण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बुमराहची कामगिरी सर्वोत्तम झाली. ५ कसोटींत त्याने ३२ बळी टिपले. पण, शेवटच्या सिडनी कसोटींत दुसऱ्या डावांत गोलंदाजी करताना त्याला पाठदुखीचा त्रास होऊ लागला. तेव्हापासून तो महिनाभर मैदानावर परतलेला नाही. सुरुवातीच्या बेडरेस्टनंतर त्याने आता तंदुरुस्तीसाठी व्यायाम सुरू केले आहेत. तो स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये कधी परतेल ते अजून निश्चित नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community