-
प्रतिनिधी
राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला असून, मालमत्ता खरेदी-विक्रीसाठी आता दुय्यम निबंधक कार्यालयाच्या बंधनातून मुक्तता मिळणार आहे. यामुळे खरेदीदार आणि विक्रेत्यांना त्यांच्या जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयातून दस्त नोंदणी करण्याची मुभा मिळणार आहे. (One State One Registration)
सध्या प्रॉपर्टी खरेदी-विक्रीसाठी संबंधित जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयातच जावे लागते. मात्र, या कार्यालयांतील वाढत्या गर्दीमुळे दस्त नोंदणीस विलंब होत होता आणि व्यवहार रखडत होते. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने ‘एक राज्य, एक नोंदणी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. (One State One Registration)
(हेही वाचा – Mahalaxmi Express च्या एसी डब्याला आग, प्रवाशांनी चेन ओढली आणि …)
राज्यात दरवर्षी सरासरी तीन लाख दस्तनोंदणी होते, ज्यातून सरकारला ५० हजार कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क मिळते. २०२४-२५ या आर्थिक वर्षात हा महसूल ५५ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आतापर्यंत दोन लाख ४१ हजार दस्त नोंदणींमधून ४७ हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. (One State One Registration)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या १०० कलमी कार्यक्रमांतर्गत महसूल विभागाने या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिलपासून करण्याची तयारी सुरू केली आहे. संगणक प्रणाली अद्ययावत करण्यासाठी विशेष सॉफ्टवेअर विकसित केले जात आहे. या बदलामुळे राज्यभरातील नागरिकांना मालमत्ता खरेदी-विक्रीस अधिक सोयीस्कर आणि सुलभ पर्याय मिळणार आहे. (One State One Registration)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community