PM Narendra Modi यांच्या भेटीनंतर ट्रम्प यांनी बांगलादेशबाबत भारताला दिला ‘फ्रि हॅन्ड’; म्हणाले, काय करायचं ते…

131
PM Narendra Modi यांच्या भेटीनंतर ट्रम्प यांनी बांगलादेशबाबत भारताला दिला 'फ्रि हॅन्ड'; म्हणाले, काय करायचं ते...
PM Narendra Modi यांच्या भेटीनंतर ट्रम्प यांनी बांगलादेशबाबत भारताला दिला 'फ्रि हॅन्ड'; म्हणाले, काय करायचं ते...

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) दोन दिवसाच्या अमेरिका दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यासह एलॉन मस्क (Elon Musk) यांची भेट घेतील. भेटीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना मोदींनी रशिया- युक्रेन युद्धाबाबत (Russo-Ukrainian War) आपली भूमिका स्पष्ट केली.

( हेही वाचा : IPL 2025 : साईराज बहुतुले राजस्थान रॉयल्स संघाचा नवीन गोलंदाजीचा प्रशिक्षक

तसेच दोन्ही नेत्यांना या भेटीत जगभरात चर्चेत असलेल्या बांगलादेशच्या मुद्यावरं चर्चा झाली. यावेळी ट्रम्प यांनी बांगलादेशबाबत एक मोठं विधान केलं. ते म्हणाले, बांगलादेशातील संकटात अमेरिकेचा सहभाग नाही. बांगलादेशचा मुद्दा कसा सोडवायचा ते मी पंतप्रधान मोदींवर (PM Narendra Modi) सोडतो. बांगलादेशबाबतचा सर्व निर्णय मोदी घेतली. बांगलादेश संबधात काय करायचं ते मोदी (PM Narendra Modi) ठरवतील, असे ट्रम्प म्हणाले.

त्यांच्या या वक्तव्यामुळे आता भारताला बांगलादेशबाबत (Bangladesh) निर्णय घेण्यासाठी मोकळीक मिळाल्याचं बोललं जात आहे. सध्या बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदुवर (Hindu) मोठ्या प्रमाणात हल्ले सुरु आहोत. शिवाय तिथली राजकीय परिस्थिती अस्थिर झाल्यामुळे माजी पंतप्रधान शेख हसीना या बांगलादेश सोडून भारतात आश्रयाला आल्या आहेत. तर शेख हसीना यांच्या प्रत्यर्पणाची मागणी बांगलादेशकडून (Bangladesh) करण्यात येत असतानाच ट्रम्प (Donald Trump) यांनी केलेलं वक्तव्य महत्वाचं मानलं जात आहे. त्यातच मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा यांच्या भारताकडे प्रत्यार्पणाला डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी हिरवा कंदील दिला आहे. (PM Narendra Modi)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.