Live In Relationship मधून जन्माला आलेल्या बाळाची १० हजारात विक्री

137

लिव्ह इन रिलेशनशीप (Live In Relationship) मधल्या नात्यातून जन्मलेले बाळाचा बिकट आर्थिक परिस्थितीमुळे सांभाळ करू शकत नसल्याचे सांगत त्याची १० हजार रूपयात विक्री करणाऱ्या आणि बाळाची खरेदी करणाऱ्या दोघांविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात (Vitthalwadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  (Live In Relationship)

यासंदर्भातील घटना अशी की जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (Women and Child Development Officer) कार्यालयाच्या १८१ या हेल्पलाईनद्वारे उल्हासनगर येथे राहणाऱ्या महिलेने ३१ जानेवारी रोजी कौटुंबिक वादाबाबत तक्रार केली होती. ही माहिती प्राप्त होताच उल्हासनगर येथील सखी केंद्र १ यांच्याकडून त्वरित महिलेला संपर्क साधण्यात आला व तिला उल्हासनगर येथील महिला व बाल विकास विभागाच्या सखी केंद्राच्या’ कार्यालयात बोलावून घेण्यात आले. पिडीत महिला ही अविवाहिता असून लीव्ह इन रिलेशनशिप मध्ये एका पुरुषासोबत राहत होती. परंतू गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यामध्ये वाद होत असल्याने ती पीडित महिला तिच्या आईसोबत उल्हासनगर येथे राहत होती. पीडिता ही गरोदर असताना त्याने होणाऱ्या बाळाचे पालकत्व स्वीकारण्यास परवानगी दिली होती, परंतु बाळाचा जन्म झाल्यानंतर मात्र आपली आर्थिक परीस्थिती खराब असून आपण त्या बाळाला सांभाळू शकत नसल्याने ते बाळ एका गरजू कुटुंबाला देण्याचे दोन्ही जैविक पालकांनी ठरवले. त्यानुसार ते बाळ कळवा येथील एका महिलेला देण्यात आले व तसे पेपर तयार केले. पीडित महिलेने दिलेल्या तोंडी माहितीनुसार त्या बाळाबद्दल १० हजार रुपये तिला दिले असून पेपरवर त्याचा काही उल्लेख न केल्याचे तिने सांगितले.

सखी केंद्राला बाळाच्या (Sold the baby) खरेदी विक्री झाल्याबद्दल लक्षात येताच महिला बाल विकास विभागाअंतर्गत येणाऱ्या जिल्हा बाल संरक्षण कक्षाला सदर माहिती मिळाली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येताच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या संबंधित कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी कळवा पोलिस स्टेशन गाठले. कळवा पोलिसांच्या मदतीने ३१ जानेवारी रोजी रात्री कळवा येथील झोपडपट्टीत या बाळाचा शोध घेवून त्या बालकाला रात्री १२.३० वाजताच्या सुमारास ताब्यात घेतले. बाळाची तब्येत बरी नसल्याचे लक्षात येताच ठाणे बाल कल्याण समिती यांच्या आदेशान्वये कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात (Chhatrapati Shivaji Maharaj Hospital) उपचाराकरिता दाखल करण्यात आले. बाळाच्या तब्येतीत सुधारणा झाल्यावर बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार सदर बालकास डोंबिवली येथील जननी आशिष दत्तक संस्थेत दाखल करण्यात आले आहे.

(हेही वाचा – tata cancer hospital mumbai : मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटल येथे कोणकोणत्या सेवा दिल्या जातात?)

या प्रकरणी ठाणे बाल कल्याण समिती यांनी दिलेल्या आदेशानुसार बालकाचे जैविक पालक तसेच बेकायदेशीर दत्तक पालक यांच्यावर विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात संबधित प्रकरणाविरोधात बाल न्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ अन्वये कलम ८०, ८१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.