बडोदे (Vadodara) येथे मराठी वाङ्मय परिषदेचे (Marathi Vangmay Parishad) दोन दिवसीय ७४ वे वार्षिक अधिवेशन ज्येष्ठ पत्रकार, व्याख्याते व लेखक डॉ. उदय निरगुडकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले. समीक्षक माधव आचवल यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य राखून संमेलनस्थळास ‘माधव आचवल नगर’ असे नाव देण्यात आले होते. येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दामोदर विष्णू नेने (दादुमिया) व कवयत्री शुभांगिनी पाटणकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांची नावे अनुक्रमे व्यासपीठ व प्रवेशद्वारास देऊन त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यात आला. महाराणी चिमणाबाई हायस्कूल (एम.सी. हायस्कूल) च्या प्रांगणात या संमेलनाचे आयोजन करण्यात आले. (Dr. Uday Nirgudkar)
( हेही वाचा : सजावटीच्या प्लास्टिक फुलांचा पुनर्वापर करणे शक्य आहे का? High Court ची केंद्र सरकारला विचारणा )
गुजरात विधानसभेचे मुख्य दंडक बाळकृष्ण शुक्ल यांच्या हस्ते दि. ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. दीप प्रज्वलनानंतर संस्थेचे अध्यक्ष मिलिंद बोडस (Milind Bodas) यांनी प्रास्ताविक केले. कार्यवाह संजय बच्छाव यांनी शुक्ल यांचे तर बोडस यांनी डॉ. निरगुडकर यांचे शाल, श्रीफळ व ग्रंथ भेट देऊन स्वागत केले. याप्रसंगी बरोडा एज्युकेशन सोसायटीच्या वतीने डॉ. महेश बसरगे व हर्षा बसरगे यांनी शुक्ल यांचा तर मुख्याध्यापक निरभवणे व सौ. ठाकरे यांनी डॉ. निरगुडकर यांचा सन्मान केला. शुक्ल यांनी उद्घाटनपर भाषणात परिषदेच्या वाटचालीचा आढावा घेऊन भविष्यातदेखील सर्व उपक्रमांमागे ठामपणे उभे राहणार असल्याचे सांगितले. बच्छाव यांनी परिचय करून दिल्यानंतर डॉ. निरगुडकर यांनी काव्यशास्त्र विनोदाची पखरण करीत विविध विषयांना हात घालत जवळजवळ दीड तास साहित्य रसिकांना खिळवून ठेवले. त्यांचे भाषण पूर्ण होताच भाषणाची पीडीएफ उपलब्ध करून देण्याची मागणी रसिकांनी केली, यावरून त्यांच्या भाषणाची उंची आणि खोली लक्षात येते. शिवानी व जयदीप बेहेरे यांनी संपूर्ण वंदे मातरम गाऊन या सत्राची सांगता केली. अंजली आशुतोष मराठे यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले. उद्घाटनाच्या सत्रानंतर डॉ. आशिष मुजुमदार (पुणे) यांचा ‘गझल आख्यान’ हा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित झाला. अनिल राव यांनी डॉ. मुजुमदारांचे स्वागत केले. (Dr. Uday Nirgudkar)
‘माध्यमे आणि साहित्य’ या विषयावर परिसंवाद
डॉ. निरगुडकर यांच्या अध्यक्षतेखाली दि. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता ‘माध्यमे आणि साहित्य’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. सुज्ञा संजय रेळेकर, संदीप कदम व कृष्ण भावे यांनी विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. परिसंवादाचा समारोप करताना डॉ. निरगुडकर यांनी वर्तमानपत्रे, सोशल मीडिया व वृत्तवाहिन्यांबद्दल सविस्तर माहिती देऊन त्यांची बलस्थाने व मर्यादा यावर तसेच साहित्य क्षेत्राच्या विकासातील योगदानावर प्रकाश टाकला. गिरीश कानिटकर, मिलिंद गद्रे व नितीन शहापूरकर यांनी सहभागी वक्त्यांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत केले. डॉ. चैती साळुंके यांनी सूत्रसंचालन केले. (Dr. Uday Nirgudkar)
संवाद निरगुडकर सरांशी!
दुपारी चार वाजता चौदा ते तीस वयोगटातील तरुणाईचा सहभाग असलेल्या ‘युवा संमेलन’ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘संवाद निरगुडकर सरांशी!’ हे ब्रीदवाक्य असलेल्या या सत्रात तरुणाईला थेट संवाद साधता आला. विषयाचे बंधन नसलेल्या या सत्रात तरुणाईसोबत पालकांनीदेखील विविध प्रश्न विचारले. या प्रश्नांना डॉ. निरगुडकर यांनी समाधानकारक उत्तरे दिलीत. संवादक म्हणून संजय बच्छाव यांनी जबाबदारी पार पाडली, तर मनाली भाटे या युवतीने सूत्रसंचालन केले. (Dr. Uday Nirgudkar)
सायंकाळी सहा वाजता संमेलनाचा समारोप आणि स्थानिक व अखिल भारतीय पातळीवर आयोजित करण्यात आलेल्या साहित्य स्पर्धांचा आणि अभिरुची गौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीराम काशिनाथ दामले यांचा विशेष योगदानासाठी सन्मान करण्यात आला. श्रीमंत महाराजा सयाजीराव गायकवाड स्मारक ट्रस्ट, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मंडळ, मराठा पाटील समाज संघटन व सावता माळी समाज या संस्थांच्या वतीने डॉ. निरगुडकर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात डॉ. निरगुडकर (Dr. Uday Nirgudkar) यांनी दोन दिवसाच्या सर्व कार्यक्रमांचा समर्पक आढावा घेऊन भविष्यातील देदीप्यमान वाटचालीसाठी अपेक्षा व्यक्त केल्या. (Dr. Uday Nirgudkar)
डॉ. निरगुडकर (Dr. Uday Nirgudkar) यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. या सोहळ्याचे सूत्रसंचालन जयेश म्हाळगी यांनी केले. पारितोषिक वितरण सोहळ्यानंतर सुनील शिनखेडे (नागपूर), वैशाली सूर्यवंशी (Vaishali Suryavanshi) (नाशिक), डॉ. नंदकुमार राऊत (मुंबई), गोकुळ गायकवाड (अहिल्यानगर), ललितकुमार धोत्रे (ठाणे) व अंजली मराठे (बडोदे) या पुरस्कारार्थींनी मनोगत व्यक्त केले. या साहित्य स्पर्धांचे परीक्षण डॉ. गिरीश गायकवाड, कवी संजय चौधरी, मुग्धा केळकर, सविता शिंदे, डॉ. वैभवी देहूकर, डॉ. संजय करंदीकर, डॉ. वनिता ठाकूर, रोहिणी खांडेकर, प्रकाश पेठे, डॉ. मृणालिनी कामत, जयश्री जोशी, क्रांती कनाटे, प्रसाद जोशी, चंद्रशेखर अग्निहोत्री व मंजिरी कर्वे यांनी केले. कोषाध्यक्ष शशांक केमकर यांनी आभार प्रदर्शन केले. मनाली भाटे हिने गायलेल्या पसायदानाने संमेलनाचा समारोप झाला. रात्री नऊ वाजता प्रा. डॉ. मृदुला दाढे (मुंबई) यांचा ‘तरी असेल गीत हे!’ हा भावगीताचा सर्वांगाने रसास्वाद घेणारा अत्यंत सुंदर कार्यक्रम झाला. नरेंद्र सकटे (कीबोर्ड) व ऋषिराज साळवी (तबला) यांनी साथसंगत केली. मिलिंद गद्रे यांनी सर्व कलावंतांचा परिचय करून दिल्यानंतर अनिल भुस्कुटे, सुजित प्रधान व सुरेंद्र शेज्वलकर यांनी ग्रंथ भेट देऊन स्वागत केले. पुढील वर्षी परिषदेचे अमृत महोत्सवी संमेलन विशेष परिश्रम घेऊन मैलाचा दगड ठरेल, अशा पद्धतीने आयोजित करण्याचा सकारात्मक विचार परिषदेच्या कार्यकारी मंडळासह साहित्य रसिकांनी व्यक्त केला. (Dr. Uday Nirgudkar)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community