Sanjay Raut यांच्या भावाचे वादग्रस्त विधान; म्हणाले, लोकांनी धुतलेली पापं अंगाला चिकटतील म्हणून…

194
Sanjay Raut यांच्या भावाचे वादग्रस्त विधान; म्हणाले, लोकांनी धुतलेली पापं अंगाला चिकटतील म्हणून...
Sanjay Raut यांच्या भावाचे वादग्रस्त विधान; म्हणाले, लोकांनी धुतलेली पापं अंगाला चिकटतील म्हणून...

लोकांनी धुतलेली पापं अंगाला चिकटतील म्हणून महाकुंभमेळ्यात (Maha Kumbh) गंगा नदीत स्नान केले नाही, असे वादग्रस्त विधान शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे भाऊ आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांनी केले आहे. खासदार संजय राऊतांच्या विधानामुळे राजकीय वातावरण अनेकदा तापल्याचे आपण पाहिले असेल, पण आता राऊतांचे भाऊ सुनील राऊत यांनी वादग्रस्त विधान करत समस्त हिंदू (Hindu) धर्मियांचा अपमान केला आहे.

( हेही वाचा : महाराष्ट्रात ‘Love Jihad’ विरोधी कडक कायदा होणार!

उत्तर प्रदेशातील प्रयागराज (Prayagraj) येथे मबाकुंभमेळा सुरु आहे. या कुंभमेळ्यात संत, मंहत, गरीब, श्रीमंत आदी सर्वचजण पवित्र स्नान करत आहेत. पण आता ठाकरे गटाचे नेते सुनील राऊत (Sunil Raut) यांनी या स्नानविषयी एक विचित्र विधान केले आहे. विक्रोळीतील कन्नमवारनगर येथे आयोजित एका कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना ते म्हणाले की, महाकुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी प्रयागराजला गेलो होतो. आज सकाळीच मुंबईला परतलो. मुंबई आल्यावर लोकांनी मला नमस्कार केला, पाया पडले. मी दोन दिवस प्रयागराजमध्ये मजा घेत होतो. कुणी किती पापं धुतली हे पाहत होतो. लोकांना ही पापं धुताना पाहिल्यावर ती पापं माझ्या अंगाला चिकटतील काय असे मला वाटले. त्यामुळे मी तिथे स्नान केले नाही. मी तसाच घरी परतलो, असे वादग्रस्त विधान सुनील राऊत (Sunil Raut) यांनी केले. त्यामुळे हिंदू (Hindu) धर्मियांकडून संताप व्यक्त केला आहे. (Sanjay Raut)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.