-
खास प्रतिनिधी
शिवसेनेचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या हस्ते दिल्लीत सत्कार झाला, यावरून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) आणि शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात ‘X’ वॉर सुरू झाले आहे. नेटकऱ्यांनी मात्र राऊत यांना विविध नावांनी संबोधून यथेच्छ समाचार घेतला. कुणी ‘झाकणझुल्या’ तर कुणी ‘गटारतोंड्या’ अशी भन्नाट नावे राऊत यांना ठेवली.
मराठा स्वाभिमान का अपमान
एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीतिल सत्कार समारंभानंतर ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांनी राऊत यांच्या प्रतिक्रियेवर एक पोस्ट टाकली. त्यात त्यांनी म्हटले की, “मराठा समाज सब देख रहा है! बालासाहेब ठाकरे के आदर्शों को ठुकराकर, न सिर्फ हिंदुत्व बल्कि मराठा स्वाभिमान का अपमान करने वाले लोग, मराठा सम्मान को क्या समझेंगे? जो खुद अपने समाज में जनाधार और सम्मान गंवा चुके हैं, वे दूसरों के सम्मान से कष्ट में हैं।“
मराठा समाज सब देख रहा है! बाला साहेब ठाकरे के आदर्शों को ठुकराकर, न सिर्फ हिंदुत्व बल्कि मराठा स्वाभिमान का अपमान करने वाले लोग, मराठा सम्मान को क्या समझेंगे?
जो खुद अपने समाज में जनाधार और सम्मान गंवा चुके हैं, वे दूसरों के सम्मान से कष्ट में हैं। https://t.co/ft1izpn3n8
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) February 13, 2025
राऊतांचे उत्तर
ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांच्या या पोस्टवर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्याला उत्तरादाखल पोस्ट केली. “Great! महाराज, इतिहास समजून घ्या. वीर महादजी शिंदे हे महान स्वाभिमानी मराठा योद्धा होते. त्यांच्या नावे पळपुट्यांना पुरस्कार देणे हा महादजी शिंदे यांचा अपमान आहे. एकनाथ शिंदे यांना जयाजीराव शिंदे यांच्या नावे पुरस्कार द्यायला काहीच हरकत नाही. महादजी यांनी दिल्ली पुढे लोटांगण घातले नाही!” असे या उत्तरात म्हटले आणि ज्योतिरादित्य सिंधिया, शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना टॅग केले.
(हेही वाचा – CM Devendra Fadnavis यांनी केले त्रिवेणी संगमात अमृतस्नान)
कमेंट्स पण वाचत जा!
राऊत (Sanjay Raut) यांच्या या उत्तरावर नेटकऱ्यांनी त्यांना खूप ट्रोल केले. एकाने, “हे तू कोण ठरवणारा रे झाकणझुल्या” असे म्हटले, तर एकाने, “गटारतोंड्या तुझी पात्रता आहे का?” अशा शब्दांत संताप व्यक्त केला. याशिवाय ‘धुनी-भांडी करणारा’, ‘हिजडा’, ‘बुरट्या’, ‘दुसऱ्याची हमाली करणारा’ असेही संबोधले. एकाने तर राऊत यांना “भाऊ एकदा कमेंट्स पण वाचत जा, म्हणजे आपण कोण आहोत, आपली लायकी काय, कळेल. तुर्तास इतकेच” असा अनाहूत सल्ला दिला.
यातील काही निवडक प्रतिक्रिया त्यांच्याच शब्दांत, खालीलप्रमाणे :
“नेहमी काय दिल्ली दिल्ली करत असता? दिल्ली च सरकार लोकशाही पद्धतीने निवडून आले आहे.. जुन्या काळात ते दिल्ली वर आक्रमण करणारे वेगळे आणि लोकशाही पद्धतीने निवडून येणारे वेगळे.. यातला फरक समजून घ्या.. कशाला स्वतःच्या पायावर दगड मारून घेताय”
“पळपुटे ते होते = जे हिंदुत्व सोडून इटालियन बाईचे आशीर्वाद घ्यायला पळाले! त्यांना सोडून देण्यात एकनाथरावांचा स्वाभिमान होता. आणि जनतेनेही भरपूर मतदान करून त्यावर शिक्कामोर्तब केले. आता पळपुटे वाट पाहत आहेत की मोदींसारखी पप्पू विदूषकची लाट केंव्हा येते आणि आपल्याला परत मतं मिळतील!”
“अरे संज्या कोणाला कोणता पुरस्कार द्यायचा हे तुझ्यासारखा तीन घरची धुणी-भांडी करणारा ठरवणार का? तुला कोण म्हणाला की मराठी माणसाला हे आवडलं नाही. चार-पाच शिळावडापाव वाले उबाठाचे शेणके म्हणजे मराठी माणूस नाही. तुला मोडाचा आजार झालाय, बसलास की जळतंय व उभा राहिलास की दुखतंय.”
“हे प्रकरण पार कामातून गेलय..आहो राऊत अजून एक तरी कर्तृत्व केलय का?..साध इलेक्शन जिंकलेले नाही आपण..कशाला अजून पचका करून घेता..महाराष्ट्रातल्या जनतेने तुम्हाला गंभीरतेने घ्यायच कधीच सोडलय ..सुधरा जरा नाहीतर लोक वेड्याच्या इस्पितळात टाकतील..”
“तुम्ही ज्यांना पळपुटे म्हणताय ते तर महा पराक्रमी आहेत त्यांनी बावळट नेतृत्व झुगारून सत्ता काबीज केली आणि बदल घडवला. तुम्ही करून दाखवा काहीतरी sollid करून. नुसती स्त्रियांना शिवीगाळ करायला आणि पत्रकारांसमोर टरटर करायला काय अक्कल लागते!”
“दिल्ली आता मुगलांची नाही , पण कांग्रेस नक्की इटालियन आहे ज्याच्या समोर तुम्ही झुकला”
“ते सर्व ठीक आहे पण शरद पवारांचं राजकारण महाराष्ट्रातील (मध्यवयातील) बच्चा बच्चा ला कळतं मग तुमच्या सारख्या शेमट्या पोरांना का कळालं नाही?”
“तुम्हाला वाटत असतील ते पळपुटे…पण त्यांनी खरं म्हणजे तुम्हाला हाकलून लावलं..तुम्ही सत्तेसाठी दगाबाजीचे नवे उच्चांक गाठले..ते भाजप वाले म्हणाले पण असतील देऊ २.५ वर्ष मुख्यमंत्री पद, पण ५६ असताना त्यासाठी हट्ट करणे, १०५ वाल्यांना संधी न देता जनतेचा कौल झुगारताना लाज नाही वाटली??”
“संजय राऊत ला कुणीतरी burnol द्या. दगड मारत फिरेल आता हा”
“जळजळतय मळमळतय…. पोटदुखी वातदुखी…. झेंडू बाम देऊ का?”
“अहो राऊत साहेब सत्यानाश केला तुम्ही शिवसेनेचा उद्धव साहेबांच्या कानाला लागून नको नको ते कानात भरवले आज ज्या नेत्याला संपूर्ण महाराष्ट्र आपला समजतो भाई म्हणून संबंधितो त्याला तुम्ही पळपुट्या म्हणता अरे संपूर्ण तुमच् कुटुंब भ्रष्टाचाराच्या चिखलात बरबटलेल आहे.”
“संजय राऊत, इतिहास नीट समजून घ्या! बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते – “सोनिया गांधीसमोर हिजडे झुकतात.” आता तुम्हाला कोणी हिजडा म्हटलं की राग का येतो? महादजी शिंदेंनी दिल्लीसमोर लोटांगण घातलं नाही, पण उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधींच्या पायाशी बसून शिवसेनेचा अभिमान संपवला! शिंदे गटावर टीका करण्यापूर्वी स्वतःच्या नेत्याच्या तोंडून ऐकलेली बाळासाहेबांची वाक्य आठवा!”
“तु ठरवणार का कोणाला कोणता पुरस्कार द्यायचा ते?? लोकांना कळते कोणाची लायकी काय आहे.. तुझी लायकी दिवसभर दुसऱ्यांची हमाली करायचीच आहे.. स्वतःला अतिविद्वान समजून उबाठाचा पक्ष खड्यात घातलास, तरी तू अजून सुधारला नाहीस”
“घरकोंबड्यांसाठी कुठला पुरस्कार असतो श्रीयुत संजय जी? आणि बडबड झेपली नाही म्हणून हॉस्पिटल मध्ये भरती होणाऱ्यासाठी सुद्धा.”
“घरबश्या मामु ला ब्रह्मांडातील नंबर 1 मामु करण्यापेक्षा नक्कीच चांगले आहे”
“तुझा उबठा आणि तू जणू काही ब्रम्हदेवच! मूर्खाचे नंदनवनातच वास्तव्य कर. .. आणि उंटावरून शेळ्या हाक. एकदा तरी राज्य सभेचा खासदार म्हणून काय काम केले ते सांग.. ज्यांना गद्दार, पळपुटे म्हणतो त्यांचाच जीवावर तू राज्यसभेत गेला आहेस हे विसरू नको”
“साहेब आणि संजय राऊत यांनी UT चा पार बोऱ्या वाजवायचा असेच ठरवलेले दिसते… यात AT चे भविष्य पणाला लागले आहे.”
“एकनाथ शिंदे लढवय्या आहे. स्वतच्या पक्षविचारसरणीशी गद्दारी करणाऱ्यापैकी नाही. स्वाभिमानाने लढणारा लढवय्या आहे. रडतराहू राऊत नाही हे जनतेने ओळखले आहे. वायफळ बडबडणारा तर मुळीच नाही.”
राऊत साहेब तुम्ही चुकत आहात यावेळेस पक्ष फोडला म्हणून पुरस्कार नाही दिला त्यांना. खाली खूप काम आहे शिंदे यांचा फक्त मुंबई – ठाणे नही करत ते. अजून सुद्धा तुमच्या पक्षाने खंजीर,कोथळा,गद्दार याच्यातुन बाहेर पडून काम करा.तुमचं फक्त मुंबई मुंबई बंद करा.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community