प्रयागराज (Prayagraj) येथे भरलेल्या महाकुंभ 2025 (Mahakumbh 2025) मध्ये लाखो भाविक आणि यात्रेकरूंना अखंड डिजिटल बँकिंग (Digital Banking Mahakumbh) सेवा प्रदान करण्यातील आपल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेला (India Post Payments Bank) अभिमान आहे. जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक मेळावा म्हणून, ‘महाकुंभ’ मेळा सर्व स्तरातील लोकांना आकर्षित करत आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक आपल्या ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनासह, सर्वांसाठी व्यापक बँकिंग (Bank) सेवा उपलब्ध करुन देत आहे. यामुळे तेथे जमलेल्यांसाठी आर्थिक व्यवहारांची सुविधा , सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित होत आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने संपूर्ण महाकुंभात 5 प्रमुख ठिकाणी सेवा काउंटर, मोबाइल बँकिंग युनिट्स आणि ग्राहक सहाय्य किओस्क स्थापित केले आहेत. महाकुंभ मेळ्यात मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना पूर्ण कार्यक्षमतेने हाताळण्यासाठी या सुविधा आरेखित केल्या आहेत. (Maha kumbha 2025)
याव्यतिरिक्त, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे विश्वासू डाक सेवक खातेदारांना त्यांच्या दाराशी बँकिंग सेवा प्रदान करत आहेत. भाविकांना त्यांच्या अचूक ठिकाणी पोहोचून कोणत्याही व्यत्ययाशिवाय आयपीपीबीच्या आधार एटीएम (एईपीएस) सेवेद्वारे त्यांच्या आधारशी जोडलेल्या कोणत्याही बँक खात्यातून रोख रक्कम काढणे यासारख्या आवश्यक आर्थिक मदतीचा लाभ घेता येईल, हे डाक सेवकांद्वारे सुनिश्चित केले जात आहे. येथे आलेले भाविक महाकुंभ परिसरात कुठेही असले तरी आयपीपीबीच्या ‘बँकिंग ॲट कॉल’ सुविधेचा वापर करून इच्छित सेवा मिळवू शकतात. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेकडे असलेल्या विविध बँकिंग सेवांचा लाभ घेण्यासाठी ते 7458025511 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकतात.
(हेही पाहा – Firing range explosion: मध्यप्रदेशात लष्कराच्या फायरिंग रेंजमध्ये भीषण स्फोट; २ जखमी, एकाचा मृत्यू )
भारत सरकारच्या डिजिटल इंडिया संकल्पनेच्या अनुषंगाने, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक महाकुंभात स्थानिक विक्रेते, छोटे व्यवसाय आणि सेवा प्रदात्यांना त्यांच्या डाकपे क्यूआर कार्डद्वारे डिजिटल पेमेंट स्वीकारण्यास सक्षम बनवत आहे. हा उपक्रम रोकडरहित परिसंस्थेला चालना देतो, रोख रकमेवरील अवलंबित्व कमी करतो आणि व्यवहारांमध्ये एकूण कार्यक्षमता देखील वाढवत आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community