Human Trafficking च्या इकोसिस्टीमला संपवण्यासाठी भारत-अमेरिका एकत्र प्रयत्न करणार; पंतप्रधान मोदींचे विधान

53
Human Trafficking च्या इकोसिस्टीमला संपवण्यासाठी भारत-अमेरिका एकत्र प्रयत्न करणार; पंतप्रधान मोदींचे विधान
Human Trafficking च्या इकोसिस्टीमला संपवण्यासाठी भारत-अमेरिका एकत्र प्रयत्न करणार; पंतप्रधान मोदींचे विधान

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर देशात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना अमेरिकेतून हाकलण्यास सुरुवात केली आहे.आतापर्यंत अमेरिकेत बेकायदेशीर राहणाऱ्या १०४ भारतीयांनाही अमेरिकेतून भारतात पाठवण्यात आले होते.याविषयी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यासोबत घेतलेल्या संयक्त पत्रकार परिषदेमध्ये एक मोठं विधान केलं आहे. आम्ही अमेरिकेत (America) बेकायदेशीर राहणाऱ्या भारतीयांना परत घेत आहोत. मात्र आमच्यासाठी ही गोष्ट इथेच थांबत नाही, असे नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. (Human Trafficking)

( हेही वाचा : Sanjay Raut यांच्या भावाचे वादग्रस्त विधान; म्हणाले, लोकांनी धुतलेली पापं अंगाला चिकटतील म्हणून…

बेकायदेशीर राहणाऱ्या नागरिकांविषयी आपली भूमिका स्पष्ट करताना डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यासमोरच मोदींनी सांगितले की, हा प्रश्न केवळ भारताचा नाही आहे. जागतिक दृष्टीकोनातून पाहिल्यास जे लोक बेकायदेशीररीत्या एखाद्या देशात राहतात, त्यांना तिथे राहण्याचा कुठलाही कायदेशीर अधिकार नाही, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. आता भारत आणि अमेरिकेबाबत बोलायचं झाल्यास जो खरा भारतीय नागरिक असेल आणि तो अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहत असेल, तर त्याला परत घेण्यास भारत तयार आहे, असेही नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी स्पष्ट केले. (Human Trafficking)

या विधानाच्या माध्यातून मोदींनी (Narendra Modi) भारतात बेकायदेशीररीत्या राहणारे बांगलादेशी (Bangladeshi) आणि रोहिंग्यांबाबतही (Rohingya) आपली भूमिका स्पष्ट केली आहे.पुढे बोलताना मोदी म्हणाले की, हे लोक सामान्य कुटुंबातील मुलं असतात. त्यांना मोठमोठी स्वप्नं दाखवली जातात. बहुतांश लोकांना दिशाभूल करून आणलं जातं. त्यामुळे मानव तस्करीमध्ये (Human Trafficking) गुंतलेल्या या संपूर्ण इको सिस्टिमवर वार करण्याची आवश्यकता आहे. मानव तस्करी बंद करण्यासाठी या प्रकारच्या इकोसिस्टिमला संपवण्यासाठी भारत आणि अमेरिका मिळून प्रयत्न करत आहेत.डोनाल्ड ट्रम्प हेसुद्धा या इकोसिस्टिमला पराभूत करण्याच्या लढाईत भारताला मदत करतील, असा मला विश्वास आहे, असेही मोदींनी शेवटी सांगितले. (Human Trafficking)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.