Tulja Bhavani Temple च्या जिर्णोद्धारासाठी पंधरा दिवसांत बैठक

रायगड विकास आणि एक पडदा चित्रपटगृहांसाठीही लवकरच निर्णय

69
Tulja Bhavani Temple च्या जिर्णोद्धारासाठी पंधरा दिवसांत बैठक
  • प्रतिनिधी

तुळजापूरच्या आई भवानी माता मंदिराच्या (Tulja Bhavani Temple) जिर्णोद्धारासह रायगड किल्ल्याचा विकास आणि एक पडदा चित्रपटगृहांसाठी सवलतीच्या योजनेबाबत लवकरच ठोस निर्णय घेतला जाणार आहे. यासंबंधी सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. पुढील १५ दिवसांत या तिन्ही विषयांवर स्वतंत्र बैठक घेण्यात येणार आहे.

तुळजापूर भवानी मंदिर जिर्णोद्धार

तुळजापूरच्या भवानी माता मंदिराचा (Tulja Bhavani Temple) संरचनात्मक अहवाल (स्ट्रक्चरल ऑडिट) शासनास सोमवारी सादर केला जाणार आहे. मंदिराच्या दुरुस्तीचे काम करणाऱ्या दोन एजन्सींमध्ये समन्वय साधून काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री शेलार यांनी दिले.

मंदिराच्या (Tulja Bhavani Temple) मुख्य गर्भगृहातील खांबांना तडे गेल्याने दैनंदिन पूजा, मूर्तीची देखभाल यावर काय परिणाम होईल, याबाबत अभ्यासक, पुजारी, मंदिर ट्रस्ट आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी बैठक घेऊन उपाय सुचवावेत, असे निर्देशही त्यांनी दिले. पुढील १५ दिवसांत सर्व संबंधितांशी चर्चा करून पुढील कार्यवाही ठरवली जाईल.

(हेही वाचा – Vasai Fort मध्ये प्री वेडिंग करणाऱ्यांचा सुळसुळाट; दुर्गप्रेमींचा संताप    )

रायगड किल्ला संवर्धनासाठी ६०० कोटींचा आराखडा

रायगड विकास प्राधिकरणाने ६०० कोटी रुपयांचा कृती आराखडा तयार केला आहे. रायगड किल्ला आणि परिसराचा विकास करण्यासाठी या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले असून याचा अभ्यास करून लवकरच संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे.

या बैठकीत रायगड प्राधिकरण, स्थानिक जिल्हाधिकारी, केंद्रीय आणि राज्य पुरातत्व विभागाचे अधिकारी सहभागी होणार आहेत.

एक पडदा चित्रपटगृहांसाठी विशेष सवलत योजना

राज्यातील १२०० एक पडदा चित्रपटगृहांपैकी फक्त ४७५ सुरू असून उर्वरित बंद पडली आहेत. ही चित्रपटगृहे पुन्हा सुरू करून मराठी चित्रपटांसाठी त्यांचा वापर करण्यासाठी सवलतीच्या योजनेचा मसुदा तयार करण्याचे आदेश मंत्री शेलार यांनी दिले.

या योजनेबाबत चित्रपटसृष्टीतील तज्ज्ञ, थिएटर मालक आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पुढील १५ दिवसांत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मराठी सिनेसृष्टीच्या विकासासाठी सरकार सकारात्मक असून लवकरच या योजनेची अंमलबजावणी केली जाईल. (Tulja Bhavani Temple)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.