Mumbai Police : रागाने घर सोडून गेलेल्या पतीला मुंबई पोलिसांनी १७ वर्षांनी आणले घरी

146
Mumbai Police : रागाने घर सोडून गेलेल्या पतीला मुंबई पोलिसांनी १७ वर्षांनी आणले घरी
Mumbai Police : रागाने घर सोडून गेलेल्या पतीला मुंबई पोलिसांनी १७ वर्षांनी आणले घरी

पत्नीला सोडून गेलेल्या पतीचा १७ वर्षांनी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) शोध घेऊन ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशीच एका महिलेला गिफ्ट दिले. तब्बल १७ वर्षांनी व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) च्या दिवशी पती पत्नीची पोलीस ठाण्यात झालेल्या भेटीचा क्षण अगदी भावूक होता असे एका अधिकारी यांनी सांगितले.

चंद्रकांत जोशी (Chandrakant Joshi) असे मागील १७ वर्षांपासून बेपत्ता असलेल्या पतीचे नाव आहे. जोशी हे पत्नी सोबत मुंबईतील काळाचौकी (Kalachowki) येथे राहत होते. एप्रिल २००७ मध्ये चंद्रकांत जोशी (Chandrakant Joshi) हे कौटुंबिक वादातून अचानक घर सोडून निघून गेले होते. राग निवळला तर पती घरी परत येईल या आशेवर पत्नीने १७ वर्षे काढली, अखेर पतीला शोधण्यासाठी तीला राज्य महिला आयोगाकडे (State Commission for Woman) जावे लागले, गेल्या वर्षी म्हणजेच मार्च २०२४ मध्ये पत्नीने महिला आयोगाकडे अर्ज करून पतीला शोधून देण्याची विनंती करण्यात आली होती.

(हेही वाचा – Human Trafficking च्या इकोसिस्टीमला संपवण्यासाठी भारत-अमेरिका एकत्र प्रयत्न करणार; पंतप्रधान मोदींचे विधान)

महिला आयोगाने काळाचौकी (Kalachowki) पोलीस ठाण्याकडे ही तक्रार पाठवून तक्रार दाखल करण्याची आणि हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला, राज्य महिला आयोग यांच्या मार्फतीने काळाचौकी पोलिस ठाण्यात हरविल्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. ही तक्रार १७ वर्षानंतर देण्यात आली असल्याने हरवलेली व्यक्ती चंद्रकांत कानू जोशी (Chandrakant Joshi) यांचा शोध घेताना पोलिसांना अनेक अडचणी समोर आल्या, जोशी यांचे मित्र, त्याचा चुलत भाऊ, सख्खी बहीण यांच्याशी संपर्क करून माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना देखील चंद्रकांत हा कोठे आहे याबाबत काहीही माहिती नव्हती.

जोशी यांचा शोध घेत असताना वेगवेगळया तांत्रिक पध्दतीचा उपयोग करून जोशी यांचे मित्राचा शोध घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असतात्यांच्या मित्रापैकी एकाने जोशी यांना २०१५ या २०१६ मध्ये मुरबाड येथे एका फॉर्म हाऊसमध्ये पाहिले असल्याचे सांगितले. परंतू नेमके कोणते फार्महाऊस होते हे त्याला सांगता येत नव्हते. त्यानंतर पुन्हा सर्व फार्महाऊसचा शोध घेत असतांना सदर इसमाने एका विशिष्ट जागेचे नाव घेतल्याचे जाणवल्याने पुन्हा सदर ठिकाणी जावून मुरबाड परिसरातील वेगवेगळया फार्म हाऊस मध्ये नमूद व्यक्तीचा शोध घेतला असता मौजा चौरे या गावातील एका फार्म हाऊस मध्ये चंद्रकांत कानू जोशी (Chandrakant Joshi) हे काम करत असतांना मिळून आले.

(हेही वाचा – Donald Trump यांचं पंतप्रधान मोदींना खास गिफ्ट; दिलं ‘हे’ पुस्तक)

व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) (१४ फेब्रुवारी) च्या दिवशी चंद्रकांत जोशी (Chandrakant Joshi) यांना काळाचौकी (Kalachowki) पोलिस ठाण्यात आणण्यात आले आणि त्यांची पत्नी यांना पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले. १७ वर्षांनी व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) च्या दिवशी पतीला बघून पत्नीच्या डोळ्यातून आनंदाश्रू निघत होते. १७ वर्षे बेपत्ता असलेल्या चंद्रकांत जोशी यांचा शोध त्यांच्या पत्नीला पोलिसांनी व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) चे गिफ्ट मिळाल्याची चर्चा पोलीस ठाण्यात सुरू होती. पतीचा शोध घेऊन दिल्याबद्दल महिलेने मुंबई पोलिस (Mumbai Police) तसेच काळाचौकी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे आभार मानले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.