Maharashtra Temperature : यंदा फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याची चाहूल; यंदाचा उन्हाळा किती कडक?

61
Maharashtra Temperature : यंदा फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याची चाहूल; यंदाचा उन्हाळा किती कडक?
Maharashtra Temperature : यंदा फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याची चाहूल; यंदाचा उन्हाळा किती कडक?

फेब्रुवारी महिन्यातच यंदा उन्हाळ्याची (summer) सुरुवात झाल्याचे चित्र असून, उन्हाचा चटका (Maharashtra Temperature) तापदायक ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानात चढ उतार जाणवला. मुळे नागरिकांना प्रचंड उकाड्यासह उन्हाच्या झळांना सामोरं जावं लागत आहे. मध्य महाराष्ट्रासह (Madhya Maharashtra) मराठवाड्यात तापमान 35 ते 38 अंशांपर्यंत पोहचला आहे. (Maharashtra Temperature)

हेही वाचा-CSMT Subway : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह चर्चगेट आणि मेट्रोजवळील भुयारी मार्ग कायमच राहणार साफसूफ

नंदुरबारमध्ये (Nandurbar) काल (14 फेब्रुवारी) कमाल तापमानाने 40 अंश ओलांडले. पुण्यात बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा 35-38 अंशांपर्यंत गेला.साताऱ्यात कराडमध्ये तापमान 40 अंश झाले होते. बहुतांश ठिकाणी साधारण कमाल तापमान असेच होते. महाराष्ट्रातील हवामान सध्या कोरडे असून, तापमानाचा पारा चांगलाच वाढलेला दिसतो. राज्यातील बहुतांश भागांत उन्हाची तीव्रता वाढली असून, आकाश निरभ्र राहिल्यामुळे उष्णतेची लाट जाणवत आहे. (Maharashtra Temperature)

हेही वाचा-Mahakumbh बद्दल अफवा पसरवणे महागात पडणार ; 54 सोशल मीडिया अकाउंट्सविरुद्ध एफआयआर दाखल

बहुतांश भागांत उन्हाची तीव्रता वाढली असून, आकाश निरभ्र राहिल्यामुळे उष्णतेची लाट जाणवत आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी कमाल तापमान 35°C पेक्षा जास्त नोंदवले गेले आहे. पुण्यातील INS शिवाजी लोणावळा येथे सर्वाधिक 41.4°C तापमानाची नोंद झाली आहे, तर गोंदियामध्ये गोंदियात येथे सर्वात कमी 10.6°C तापमान नोंदवले गेले आहे. (Maharashtra Temperature)

हेही वाचा-“स्थानिक स्वराज्य संस्था जिंका, शिल्लक सेना संपवून टाका” , Eknath Shinde यांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

मुंबईतही (Mumbai) उन्हाचा जोर जाणवत असून, सांताक्रूझ येथे कमाल तापमान 35.7°C आणि किमान तापमान 21.2°C नोंदले गेले आहे. पुढील काही दिवसांतही राज्यातील तापमान वाढण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात उन्हाच्या तीव्रतेत आणखी वाढ होऊ शकते. कोकणात आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्याने तापमानवाढ जाणवते. (Maharashtra Temperature)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.