Ladki Bahini Yojana : लाडकी बहीणींना फेब्रुवारीचा हफ्ता कधी मिळणार ? माहिती आली समोर

130
Ladki Bahini Yojana : लाडकी बहीणींना फेब्रुवारीचा हफ्ता कधी मिळणार ? माहिती आली समोर
Ladki Bahini Yojana : लाडकी बहीणींना फेब्रुवारीचा हफ्ता कधी मिळणार ? माहिती आली समोर

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना (Ladki Bahini Yojana) राज्यात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय ठरली. मात्र विधानसभा निवडणूक निकालानंतर चाळणी लावत निकषात बसत नसतानाही लाभ घेणाऱ्या महिलांना योजनेतून बाहेर काढण्याचे काम सरकारने हाती घेतलं आहे. लाडकी बहीण योजनेबाबत अनेक चर्चा सध्या सुरु असून याबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. (Ladki Bahini Yojana)

हेही वाचा-महाराष्ट्राचा तुरुंग तहव्वूर राणासाठी तयार : CM Devendra Fadnavis यांची माहिती

सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) लाडकी बहीण योजनेवर (Ladki Bahini Yojana) ताशेरे ओढल्यानंतर लाडकी बहीण योजनेचं काय होणार याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थिती झाले आहेत. अशात लाडकी बहीण योजनेबद्दल उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी महत्त्वाची माहिती दिलीय.सूर्य चंद्र असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असं विधान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलंय. विरोधकांकडून योजना बंद होणार असल्याचा महिलांमध्ये संभ्रम पसरवण्याचं काम सुरु असल्याचं ही त्यांनी म्हटलंय. (Ladki Bahini Yojana)

हेही वाचा-Maharashtra Temperature : यंदा फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याची चाहूल; यंदाचा उन्हाळा किती कडक?

आता महिला लाभार्थीच्या नावावरील चारचाकी वाहनांची पडताळणी सुरू आहे. अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणीसंदर्भातील निर्णय राज्यस्तरावरूनच होणार आहे. त्यानंतर पात्र लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा लाभ वितरीत केला जाईल. त्यासाठी मार्च ही उजाडू शकतो. या पडताळणीमुळे सध्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचाही (Annapurna Scheme) लाभ थांबवला आहे. (Ladki Bahini Yojana)

5 लाख महिला अपात्र
अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांमध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला – 2,30,000 महिला, वय वर्षे 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला -1,10,000 महिला, कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या,स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला – 1,60,000 महिला अशा एकूण 5 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. (Ladki Bahini Yojana)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.