- ऋजुता लुकतुके
२०१७ च्या हंगामानंतर पहिल्यांदाच आयसीसी चॅम्पियन्स करंडक (Champions Trophy 2025) स्पर्धा होत आहे. आणि यंदा १९ फेब्रुवारीपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती इथं हायब्रीड पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धेसाठी आयसीसीने बक्षिसाच्या रकमेतही मोठी वाढ केली आहे. अगदी शेवटच्या क्रमांकावर राहणारा संघही रिकाम्या हातने परतणार नाही, असं आयसीसीने म्हटलं आहे. आणि आधीच्या स्पर्धेच्या तुलनेत रकमेत ५३ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. साखळी सामने आणि मग बाद फेरीपर्यंत पोहोचलेल्या संघांची रक्कम अर्थातच बाकीच्या संघांच्या तुलनेत वाढत जाईल. विजेत्या संघाला जवळ जवळ २० कोटी रुपये मिळणार आहेत. तर संपूर्ण स्पर्धेवर ६९ लाख अमेरिकन डॉलर इतक्या बक्षिसाची उधळण आयसीसीकडून केली जाणार आहे.
A substantial prize pot revealed for the upcoming #ChampionsTrophy 👀https://t.co/i8GlkkMV00
— ICC (@ICC) February 14, 2025
(हेही वाचा – Isha Ambani Net Worth : ४५० कोटींचं घर, १६५ कोटींचा नेकलेस, ३१ लाखांची बॅग वापरणारी ईशा अंबानी आहे ‘इतक्या’ कोटींची मालकीण)
८ वर्षांनी चॅम्पियन्स करंडक (Champions Trophy 2025) परतणार आहे. यापूर्वी ही स्पर्धा २०१७ मध्ये खेळवण्यात आली होती. त्यामुळे यंदा बक्षिसाची रक्कम नजरेत भरेल अशी आहे. विजेत्या संघाला २.२४ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे २० कोटी रुपये दिले जातील. त्याच वेळी, उपविजेत्या संघाला १.१२ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे १० कोटी रुपये मिळतील. याशिवाय, उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या दोन्ही संघांना बक्षीस म्हणून अंदाजे ५ कोटी रुपये दिले जातील.
विशेष म्हणजे गटवार साखळीत बाहेर पडणारे संघही रिकाम्या हाताने जाणार नाहीत. पाचव्या किंवा सहाव्या स्थानावर असलेल्या संघांना ३.५ लाख डॉलर्स म्हणजेच अंदाजे ३ कोटी रुपये मिळतील. त्याच वेळी, सातव्या आणि आठव्या स्थानावर असलेल्या संघांना १ लाख ४० हजार डॉलर्स म्हणजेच १ कोटी २० लाख रुपये दिले जातील. याशिवाय, गट टप्प्यातील प्रत्येक विजयासाठी ३४ हजार डॉलर्स म्हणजेच अंदाजे ३० लाख रुपये दिले जातील. दुसरीकडे, या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आठही संघांना सव्वा लाख अमेरिकन डॉलर म्हणजेच अंदाजे १ कोटी रुपये वेगळे दिले जातील. (Champions Trophy 2025)
(हेही वाचा – 2030 पर्यंत भारत-अमेरिका व्यापार दुप्पट होणार;ट्रम्प यांच्या भेटीनंतर PM Narendra Modi यांनी व्यक्त केला विश्वास)
🚨 THE PRIZE MONEY FOR CHAMPIONS TROPHY 2025 WINNERS IS 20.8 CR 🚨 pic.twitter.com/KDWuyzEUvL
— Johns. (@CricCrazyJohns) February 14, 2025
- विजेता संघ : २.२४ दशलक्ष डॉलर्स (१९.४६ कोटी रुपये)
- उपविजेता : १.१२ दशलक्ष डॉलर्स (९.७३ कोटी रुपये)
- उपांत्य फेरीतील खेळाडू : ५.६ लाख डॉलर्स (४.८६ कोटी रुपये)
- पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावरील संघ : ३.५ लाख डॉलर्स (३.०४ कोटी रुपये)
- सातव्या किंवा आठव्या क्रमांकाचा संघ : १.४ लाख डॉलर्स (रु.१.२२ कोटी)
- गट टप्प्यातील विजय : १.४ लाख डॉलर्स (रु.१.२२ कोटी)
- हमी रक्कम : १.२५ लाख डॉलर्स (रु. १.०९ कोटी)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community