-
ऋजुता लुकतुके
गुगल इंडिया आणि गुगल क्लाऊड इंडिया या कंपन्या आता बीकेसीमधील त्यांच्या व्यावसायिक जागांसाठी मिळून महिन्याला ४.७९ कोटी रुपयांचं भाडं भरणार आहेत. फेब्रुवारी २०२५ मध्येच त्यांच्या भाडेपट्टी कराराचं नुतनीकरण झालं आहे आणि सुधारित भाड्याची ही तोंडात बोटं घालायला लावणारी रक्कम समोर आली आहे. स्क्वेअर यार्ड्स या प्रॉपर्टीविषयक वेबसाईटने ही माहिती दिली आहे. गेल्यावर्षी गुगलने मुंबईत आपल्या सेवेचा विस्तार केला आणि गुगल क्लाऊड कार्यालयही मुंबईत हलवलं होतं. (Google Pays Rent of 4.8 CR)
(हेही वाचा – Ladki Bahini Yojana : लाडकी बहीणींना फेब्रुवारीचा हफ्ता कधी मिळणार ? माहिती आली समोर)
मुंबईच्या वांद्रे-कुर्ला वसाहतीत १.११ लाख वर्ग फुटाच्या ऑफिससाठी दरमहा ३.५५ कोटी रुपये भाडे देणार आहे. तर गुगल क्लाउड इंडियाने आपल्या बीकेसीतील जागेसाठी १.२४ कोटी रुपये मासिक भाडेपट्टीचा करार केला आहे. हा मुंबईतील या घडीचा सगळ्यात मोठा व्यावसायिक जागेसाठीचा करार आहे. या व्यवहारासाठी एकट्या गुगल क्लाऊडने मूळ मालकांकडे ३.४८ कोटी रुपयांची सुरक्षा ठेव ठेवली आहे. या व्यवहाराअंतर्गत गुगलने एका वर्गफुटासाठी ३२० रुपये या दराने भाडं देऊ केलं आहे वांद्रे-कुर्ला संकुल हे मुंबईतील सगळ्यात मोठं आणि मोक्याच्या जागी असलेलं व्यापारी संकुल आहे. रिझर्व्ह बँक, राष्ट्रीय शेअर बाजार, ॲपल, नेटफ्लिक्स, रिलायन्स जिओ सेंटर, फेसबुक ॲमेझॉन, अदानी समुह यासारख्या देशातील आघाडीच्या फॉर्च्युन ५०० कंपन्यांचं कार्यालयही इथेच आहे. (Google Pays Rent of 4.8 CR)
(हेही वाचा – BCCI Code of Conduct : स्टार खेळाडूने ऑस्ट्रेलियात स्वत:बरोबर नेल्या २७ बॅगा, २५० किलोंचं वजन)
तर गुगल ही जगातील आघाडीची टेक कंपनी आहे आणि अलीकडेच कंपनीने आपली गुगल क्लाऊड सेवेचा विस्तार भारतात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अंतर्गत भारतात हैद्राबाद इथं मोठं डेटासेंटर सुरू करण्याचा कंपनीचा विचार आहे. आणि त्याचं मुख्य कार्यालय हे मुंबईत बीकेसी इथं असणार आहे. त्यासाठी मुंबईतील कार्यालयासाठी भाडेकराराचं नुतनीकरण करण्यात आलं आहे. गुगल कंपनीची भारतात ५ कार्यालयं आहेत आणि मुंबई, बंगळुरू, हैद्राबाद, गुरग्राम तसंच पुणे इथं ही कार्यालयं आहेत आणि तिथे १५,८५० कर्मचारी काम करतात. गुगलचं अमेरिकेबाहेरचं सगळ्यात मोठं केंद्र म्हणून भारत ओळखलं जातं. (Google Pays Rent of 4.8 CR)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community