मालवणमध्ये मार्चपर्यंत उभारणार छत्रपती शिवरायांचा पुतळा; मंत्री Shivendraraje Bhosale यांचे आश्वासन

75
मालवणमध्ये मार्चपर्यंत उभारणार छत्रपती शिवरायांचा पुतळा; मंत्री Shivendraraje Bhosale यांचे आश्वासन
मालवणमध्ये मार्चपर्यंत उभारणार छत्रपती शिवरायांचा पुतळा; मंत्री Shivendraraje Bhosale यांचे आश्वासन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण (Malvan) येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj statue) नव्याने उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून (Department of Public Works) हा पुतळा (statue) मार्चपर्यंत तयार होईल, असे आश्वासन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिले. (Shivendraraje Bhosale)

शिवेंद्रराजे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती मंत्री शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांचे आश्वासन शिवाजी महाराज यांचा नवा ६० फुटी पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj 60 feet statue) उभारण्याचे काम ख्यातनाम शिल्पकार राम सुतार (Sculptor Ram Sutar) आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार यांच्या कंपनीला देण्यात आले आहे. राम सुतार आर्ट क्रिएशन्स (Ram Sutar Art Creations) या कंपनीने याआधी गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ (Statue of Unity) या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे काम पाहिले होते.

(हेही वाचा – आघाडीत होणार बिघाडी! उद्धव ठाकरेंना Congress देणार मोठा झटका?)

राम सुतार यांच्या कंपनीला २०.९५ कोटींमध्ये हे काम देण्यात आले. हे काम त्यांना सहा महिन्यांत पूर्ण करावे लागेल. तसेच १०० वर्षे टिकेल असा पुतळा बांधण्याची अट घातली गेली आहे. कंत्राटदार कंपनीने १० वर्षे पुतळ्याचे देखभाल आणि दुरुस्ती करण्याची अट आहे. मार्चनंतर कार्यक्रमात या पुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात येणार आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.