Jio-Hotstar Launch : रिलायन्स, स्टार विलिनीकरणानंतर जिओ-हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मची निर्मिती

Jio-Hotstar Launch : हा देशातील सगळ्यात मोठा ओटीटी प्लॅटफॉर्म असेल.

92
Jio-Hotstar Launch : रिलायन्स, स्टार विलिनीकरणानंतर जिओ-हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मची निर्मिती
  • ऋजुता लुकतुके

रिलायन्स जिओ आणि स्टार यांच्या विलिनीकरणानंतर आता अपेक्षेप्रमाणेच जिओ-हॉटस्टार या नवीन प्लॅटफॉर्मची निर्मिती झाली आहे. आधीचा जिओ सिनेमा आणि डिस्नी हॉटस्टार यांच्या विलिनीकरणाने हा नवीन प्लॅटफॉर्म तयार झाला आहे. कंपनीने आयपीएलचं औचित्य साधून तातडीने या प्लॅटफॉर्मची घोषणा केली आहे. कारण, इथे आता आयपीएल सामन्यांचं प्रसारण होणार आहे. आधीच्या जिओ सिनेमा आणि डिस्नी हॉटस्टार या दोन ओटीटींवरील सर्व मालिक व मनोरंजनाचा मजकूर आता या एकाच ॲपवर पाहता येईल. कंपनीने या ओटीटीसाठी नवीन सब्सक्रिप्शन दरही जाहीर केले आहेत. (Jio-Hotstar Launch)

(हेही वाचा – आघाडीत होणार बिघाडी! उद्धव ठाकरेंना Congress देणार मोठा झटका?)

प्लॅन

तीन
महिने

एक

वर्ष

उपलब्धता

मोबाइल प्लॅन

₹१४९

₹४९९

मोबाइल डिव्हाइस

सुपर प्लॅन

₹२९९

₹८९९

मोबाईल, वेब आणि लिव्हिंग रूम प्लॅटफॉर्मवर दोन डिव्हाइसवर एकाच वेळी

प्रीमियम प्लॅन

₹४९९

₹१,४९९

चार उपकरणांवर जाहिरातमुक्त सामुग्री (लाइव्ह क्रीडा/कार्यक्रम वगळून)

क्रीडाविषयक कार्यक्रम, मनोरंजक कार्यक्रम आणि सोशल मीडिया कार्यक्रम असे तीन वेगवेगळे विभाग करण्यात आले आहेत आणि या तीनही कार्यक्रमांची जबाबदारी तीन सीईओंवर सोपवण्यात आली आहे. केविन वाझ यांच्यावर मनोरंजन विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर किरण मणी यांच्यावर डिजिटल माध्यमाची तसंच संजोग गुप्ता यांच्यावर क्रीडा विषयक कार्यक्रमांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नवीन संस्थेच्या अध्यक्ष असतील नीता अंबानी तर उपाध्यक्ष असतील विजय शंकर. (Jio-Hotstar Launch)

(हेही वाचा – Shivsena UBT मधील ३ नेत्यांची हकालपट्टी; पक्षविरोधी कृत्य केल्याचा ठेवला ठपका)

दुसरीकडे, रिलायन्स समुहाने वायकॉम १८ मधील आणखी १३ टक्के हिस्सेदारी विकत घेतली आहे. त्यामुळे वायकॉममधील ७० टक्के हिस्सेदारी आता रिलायन्स समुहाकडे आली आहे. स्टार आणि कलर्स यांचा वाहिनी समुह तसंच जिओ सिनेमा आणि हॉटस्टार या डिजिटल माध्यमातील वाहिन्या यांचं आता एकत्रीकरण करण्यात येईल. हा विलिनीकरण प्रक्रियेचा पुढील टप्पा असणार आहे. समुहाकडे आता १०० च्या वर वाहिन्या आणि १०,००० तासांच्या वर मनोरंजनात्मक कार्यक्रम तयार आहेत. कलर्स तसंच स्टार या वाहिन्यांची नावंही आगामी काळात बदलण्यात येतील. येणाऱ्या दिवसांत वाहिन्यांचंही असंच एकत्रीकरण करण्यात येईल. (Jio-Hotstar Launch)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.