I.N.D.I. Alliance : काँग्रेस-तृणमूलमध्ये दुरावा वाढणार

74
I.N.D.I. Alliance : काँग्रेस-तृणमूलमध्ये दुरावा वाढणार
  • प्रतिनिधी 

इंडी आघाडी मध्ये दिल्लीच्या निकालानंतर मतभेद निर्माण व्हायला सुरवात झाली आहे. काँग्रेसचे नेतृत्व मान्य न करता आघाडीत काँग्रेसला राहण्याचा अधिकार नसल्याची चर्चा सुरु झाली आहे. तसेच काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये बराच दुरावा निर्माण झाला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसशी हातमिळवणी करणार नसल्याचे जाहीर केले. त्यानंतर तृणमूलच्या खासदारांनी काँग्रेसविषयी अतिशय आक्रमक भूमिका मांडली. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील दुरावा वाढण्याची शक्यता बळावली आहे. (I.N.D.I. Alliance)

(हेही वाचा – Google Pays Rent of 4.8 CR : बीकेसीतील जागेसाठी गुगल भरणार ४.८ कोटी रुपयांचं भाडं)

ममतांनी कोलकत्यात तृणमूलच्या आमदारांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीसाठी एकला चलो रे चा नारा दिला. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल ताजा असतानाच ममतांनी जाहीर केलेला निर्णय चर्चेचा विषय बनला. तृणमूलचे नेते कीर्ती आझाद यांनी दिल्लीतील आपच्या पराभवाचा ठपका काँग्रेसवर ठेवला. तसेच, काँग्रेस मित्रपक्षांचा विश्वासघात करत असल्याचा आरोपही केला. काँग्रेसच्या पाठीशी जनाधार राहिलेला नाही. दिल्लीत आपशी हातमिळवणी केली असती, तर बरं झालं असतं असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. (I.N.D.I. Alliance)

(हेही वाचा – आघाडीत होणार बिघाडी! उद्धव ठाकरेंना Congress देणार मोठा झटका?)

इंडी आघाडीचे नेतृत्व ममतांनी करावे

तसेच इंडी आघाडीत राहण्याचा अधिकार काँग्रेसला राहिलेला नाही, असे ते म्हणाले. त्या आघाडीचे नेतृत्व ममतांनी करावे, अशी अपेक्षाही त्यांनी पुन्हा व्यक्त केली. तृणमूलचे आणखी एक खासदार सौगत रॉय यांनी ममतांच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले. ममता आमच्या पक्षाच्या प्रमुख आहेत. त्यांचे वक्तव्य म्हणजे पक्षाची भूमिका असते. भाजपशी लढण्यासाठी तृणमूल एकटा पुरेसा असल्याचे त्यांनी याआधी सिद्ध केले आहे. आम्ही पक्षहिताचा त्याग करून आघाडी बळकट करू शकत नाही, असे ते म्हणाले. (I.N.D.I. Alliance)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.