वक्फ विधेयक मुस्लिमांविरोधात असल्याची काहींकडून दिशाभूल; मंत्री Kiren Rijiju यांचे विधान

64
वक्फ विधेयक मुस्लिमांविरोधात असल्याची काहींकडून दिशाभूल; मंत्री Kiren Rijiju यांचे विधान
वक्फ विधेयक मुस्लिमांविरोधात असल्याची काहींकडून दिशाभूल; मंत्री Kiren Rijiju यांचे विधान

आज भारतात अनेक मुस्लिम कुटुंबे श्रीमंत नाहीत. वक्फ मालमत्तेचा लाभ सर्वांना मिळला पाहिजे. मात्र काही लोक मुस्लिम समाजाची दिशाभूल करत आहेत की, वक्फ दुरूस्ती विधेयक मुस्लिमांच्या विरोधात आहे. पण, तसे नाही आपला देश कायदा, संविधान (Constitution) आणि व्यवस्थेवर चालतो. सरकार किंवा कोणतीही व्यक्ती वक्फ मालमत्तेशी छेडछाड करू शकत नाही, असे अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी दि. १५ फेब्रुवारी रोजी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. (waqf bill)

( हेही वाचा : Apollo Hospital Share Price : चांगल्या तिमाही निकालांनंतरही अपोलो हॉस्पिटलचे शेअर का पडले?

जम्मू-काश्मीर दौऱ्यावर असलेले रिजिजू (Kiren Rijiju) म्हणाले की, “जगात सर्वाधिक वक्फ मालमत्ता भारतात आहेत. देशात अनेक मुस्लिम कुटुंब श्रीमंत नाहीत. त्यांनाही वक्फ मालमत्तेचा लाभ मिळाला पाहिजे, अशी केंद्र सरकारची भूमिका आहे, असेही रिजिजू म्हणाले. (Kiren Rijiju)

सूफी तीर्थक्षेत्रे देतात प्रेमाचा संदेश

जम्मू-काश्मीर (Jammu & Kashmir) वक्फ बोर्डाने (waqf board) हजरतबल तीर्थक्षेत्राचे नूतनीकरण करण्यासाठी घेतलेल्या निर्णयाचा मला खूप आनंद आहे. राज्यांच्या वक्फ बोर्डाला पाठिंबा देणे ही माझी जबाबदारी आहे आम्ही जम्मू-काश्मीर (Jammu & Kashmir) वक्फ बोर्डाला (waqf board) पाठिंबा देऊ. सूफी (Sufi) तीर्थक्षेत्रे प्रेमाचा संदेश देतात. आम्ही अशा आणखी स्थळांचा विकास करणार आहोत, अशी माहिती रिजिजू (Kiren Rijiju) यांनी दिली. (Kiren Rijiju)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.