Dharavi Redevelopment Project : पुनर्विकासाच्या समर्थनार्थ धारावीकर उतरले रस्त्यावर; मोर्चा काढत दिला विरोध करणाऱ्यांना इशारा

171
Dharavi Redevelopment Project : पुनर्विकासाच्या समर्थनार्थ धारावीकर उतरले रस्त्यावर; मोर्चा काढत दिला विरोध करणाऱ्यांना इशारा
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

स्वार्थी राजकारण आणि लालफितीच्या कारभारामुळे अनेक दशकांपासून रखडलेला धारावी पुनर्विकास प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा, तसेच या प्रकल्पात खोडा घालणाऱ्यांवर शासनाने कठोर कारवाई करावी, या प्रमुख मागण्यांसह हजारो धारावीकर शनिवारी सकाळी रस्त्यावर उतरले. सुमारे 3000 अबालवृद्ध स्थानिकांच्या या मोर्चाने धारावीतील रहिवाशांची भूमिका अधोरेखित करत प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांना थेट चपराक लगावली आहे. महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी (म्हाडा) कार्यालयाबाहेर या मोर्चाची सांगता झाली. सोमवारी, या मोर्चातील शिष्टमंडळ धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या (डीआरपी) वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करणार आहेत. दी साऊथ इंडियन नाडार महाजन संघम, प्रगती महिला सेवा मंडळ यांसह अन्य संस्थांच्या पुढाकाराने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. (Dharavi Redevelopment Project)

(हेही वाचा – मॅरेथॉनमुळे Atal Setu १४ तासांसाठी राहणार बंद)

डीआरपी अधिकाऱ्यांना धारावीकरांकडून देण्यात येणाऱ्या निवेदनात, पुनर्विकास प्रकल्पाला गती देण्याची मागणी केली आहे. तसेच धारावीकरांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यावश्यक असलेल्या या पुनर्विकास प्रकल्पाच्या सर्वेक्षणात बाधा आणणाऱ्या लोकांवर शासनाने कठोर कारवाई करावी, अन्यथा धारावीकर आक्रमक भूमिका घेतली, असा इशाराही धारावीकरांनी दिला आहे. (Dharavi Redevelopment Project)

(हेही वाचा – PM Narendra Modi १६ फेब्रुवारीला ‘भारत टेक्स २०२५’ मध्ये होणार सहभागी)

पहिल्यांदाच, अशा प्रकारे धारावी पुनर्विकास प्रकल्पाला समर्थन देण्यासाठी काढण्यात आलेल्या या जनमोर्चाला, सकाळी सुमारे 11.30 वाजता शीव रेल्वे स्थानकाबाहेरील सिग्नल जवळून सुरुवात झाली. सर्व वयोगटांतील रहिवाशांनी पुनर्विकास प्रकल्पाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. ‘गरिबी और गंदगी से दूर,धारावी का विकास जरूर’ , ‘धारावी का विकास, अभी नहीं – तो कभी नहीं’ , ‘घर घर में बोले नारी, अब धारावी के सुधार की बारी’, ‘मेरे बच्चो का पक्का घर, मेरा सपना’ अशा विविध संदेशांचे फलक देखील मोर्चात सामील झालेल्या धारावीकरांच्या हाती होते. रहिवाशांनी या मोर्चाच्या माध्यमातून आपले हक्काचे घर, मूलभूत पायाभूत सुविधा, अद्ययावत आरोग्य सुविधा, दर्जेदार शैक्षणिक संस्था, रोजगाराच्या संधी यासाठी आवाज उठवला. धारावी पुनर्विकास प्रकल्प लवकर पूर्ण करावा, या मागणीसाठी रहिवाशांनी उत्स्फूर्तपणे काढलेल्या या मोर्चामुळे संपूर्ण धारावीत एक वेगळा संदेश गेला असून यामुळे या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या लोकांचे धाबे दणाणले आहेत. (Dharavi Redevelopment Project)

(हेही वाचा – Chhattisgarh मध्ये नगरपालिका निवडणुकीत भाजपाचा विजय; Raigarh मध्ये चहावाला बनला महापौर)

धारावीकरांच्या मनातली भावना

” गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही आमच्या नव्या हक्काच्या घरांच्या प्रतीक्षेत आहोत. या नव्या घरांमध्ये स्वच्छतागृह आणि इतर सुविधा असतील. मात्र काही राजकारणी विशेषतः गायकवाड भगिनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी धारावी पुनर्विकासाला विरोध करत आहेत. अशा सर्व लोकांना धारावीकरांच्या मनातली भावना जाहीरपणे सांगण्यासाठी आजचा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. आमच्या हक्कांच्या घरासाठी आम्ही शासनाच्या मागे ठामपणे उभे राहून हा प्रकल्प पूर्णत्वास नेऊ, याची मला खात्री आहे” (Dharavi Redevelopment Project)

– एम. नाडेश्वरन, स्थानिक रहिवासी

शासनाने कठोर कारवाई केली नाही, तर…

“देशाची आर्थिक राजधानी उभी करण्यात मोलाचे योगदान असणाऱ्या कामगार आणि कष्टकऱ्यांची धारावी आहे. आजवर गप्प बसून पुनर्विकासाचा तमाशा बघणाऱ्या धारावीकरांना आता जाग आली आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प रोखणाऱ्या लोकांवर शासनाने कठोर कारवाई केली नाही, तर धारावीची जनता पुन्हा एकदा मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरेल” (Dharavi Redevelopment Project)

– संजय गुप्ता, स्थानिक रहिवासी

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.