BMC : छत्रपती शिवाजी महाराज मार्केटच्या जागेबाबतची स्थगिती मागे? भूखंड लिलावासाठी लवकरच जाहिरात

72
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

महापलिका प्रशासनाने उत्पन्न वाढीच्या दृष्टीकोनातून विचार करत वापरात नसलेल्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराज मंडईच्या जागेसह वरळीतील अस्फाल्ट प्लांट अणि मलबार हिल येथील बेस्टचे रिसिव्हींग स्टेशनच्या जागा लिलाव पद्धतीने भाडे तत्वावर जाहिरात प्रदर्शित केल्यानंतर याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर महापालिकेने वरळी अस्फाल्टच्या जागेच्या लिलावासाठी जाहिरात प्रदर्शित केली असून आता मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मंडईच्या जागेसाठीही जाहिरात प्रदर्शित केली जाणार आहे. लवकरच मंडईची जागा भाडेतत्वावर देण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासकांच्या मंजुरीने जाहिरात प्रदर्शित केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. (BMC)

(हेही वाचा – वक्फ विधेयक मुस्लिमांविरोधात असल्याची काहींकडून दिशाभूल; मंत्री Kiren Rijiju यांचे विधान)

मुंबई महापालिका प्रशासनाने आता उत्पन्न वाढीचा विचार करत काही विनावापर असलेल्या आणि भविष्यात ज्या जागांची महापालिकेला गरज नाही असे भूखंड भाडेकरार पट्ट्यावर देऊन त्यातून महसूल वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तीन भूखंड लिलाव पध्दतीने भाडेकरारावर देण्यासाठी स्वारस्य अभिरुची अर्ज मागवण्यात आले होते. मलबारहिलमधील जागा बेस्टकडे कायम राखण्यासाठी तसेच शिवाजी मंडईच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याने ही प्रक्रिया मागे घेतली होती. (BMC)

(हेही वाचा – Dharavi Redevelopment Project : पुनर्विकासाच्या समर्थनार्थ धारावीकर उतरले रस्त्यावर; मोर्चा काढत दिला विरोध करणाऱ्यांना इशारा)

त्यानंतर महापालिकेने एकमेव वरळी अस्फाल्ट येथील१० हजार८४७ चौरस मीटरची जागा जागा लिलाव पध्दतीने भाडेकरारावर देण्यासाठी २० फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज प्राप्त होतील अशाप्रकारे जाहिरात प्रदर्शित केली आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज मंडईची जागा भाडेकरावर देण्यास मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याने अखेर महापालिका प्रशासक तथा आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी त्यांची समजूत काढल्याने या भूखंडावरील स्थगिती उठवण्यात आली आहे. त्यामुळे याबाबतची जाहिरात लवकरच प्रदर्शित करून स्वारस्य अर्ज मागवले जातील, अशी माहिती मिळत आहे. मंडईच्या जागेचे एकूण क्षेत्रफळ ८११६ चौरस मीटर एवढे असून याठिकाणी भविष्यात शॉपिंग सेंटर तथा मॉल उभारता येऊ शकते. सध्या मडईच्या जागेवर मंडई आणि महापालिका कार्यालय असे आरक्षण असले तरी भविष्यात भाडेकरारावर हा भूखंड दिल्यानंतर हे आरक्षण बदलले जावू शकते,असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. वरळी अस्फाल्टच्या जागेतून महापालिकेला सुमारे २०६९ कोटी रुपये आणि मंडईच्या जागेतून महापालिकेला २१७५ कोटी रुपये एवढा महसूल प्राप्त होणे अपेक्षित आहे. (BMC)

(हेही वाचा – Champions Trophy 2025 : ‘बुमराह नसेल तरी फरक पडणार नाही,’ असं बीसीसीआयचे सचिव का म्हणाले?)

भाडेकरारावर कोणत्या जागांचा होणार लिलाव? 

वरळी अस्फाल्ट प्लांट, सीएस क्रमांक १६२९ (अंशत 🙂

जागेचे क्षेत्रफळ : १०,८४७ चौरस मीटर

महापालिका ए वॉर्ड, छत्रपती शिवाजी महाराज मंडई, सीएस क्रमांक १५००

जागेचे क्षेत्रफळ : ८,११६ चौरस मीटर

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.