
देशात विजेची वाढती मागणी लक्षात घेता वीज निर्मितीचे पर्यायी मार्ग शोधले जात आहेत. पवन ऊर्जा, सौर ऊर्जा यांसारख्या अक्षय ऊर्जा प्रकल्पांवर भर दिला जात आहे. परंतु त्यापेक्षा वेगळा प्रयोग येत्या कालावधीत मुंबईत होणार आहे. मुंबईत समुद्रांच्या लाटांपासून वीजनिर्मिती केली जाणार असून केंद्र सरकारचे स्वामित्व असलेली भारत पेट्रोलियम कंपनी लिमिटेड (बीपीसीएल) हा प्रकल्प सुरु करणार आहे. त्यासाठी बीपीसीएल इस्त्रायलच्या कंपनीचे सहकार्य घेणार आहे. त्यामुळे देशातील समुद्राच्या लाटांपासून वीज निर्मितीची पहिला पायलट प्रोजेक्ट मुंबईत होत आहे. (Sea Waves Electricity Generation)
दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या ‘इंडिया एनर्जी वीक’ (IEW) या कार्यक्रमात देशाच्या वाढत्या इंधन आणि ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. पर्यावरणास अनुकूल आणि स्वच्छ ऊर्जा निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून बीपीसीएलने मुंबईतील महासागरासारख्या समुद्र किनारी अक्षय ऊर्जा स्त्रोतांद्वारे वीज निर्मितीचे नियोजन केले असल्याची माहिती दिली. (Sea Waves Electricity Generation)
(हेही वाचा – Water : पूर्व उपनगरांतील चेंबूर ते गोवंडी मानखुर्दपर्यंतची पाणी समस्या अंतिम टप्प्यात; सहा महिन्यांनंतर धो धो पाणी)
इस्त्रायलच्या कंपनीशी करार
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासंदर्भात बीपीसीएल आणि इस्त्रायलची इको वेव पॉवर या कंपनीत समुद्राच्या लाटांपासून वीज निर्मितीबाबत करार होणार आहे. मुंबईच्या समुद्र किनारी 100 किलोवॅट वीज निर्मितीचा प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. इस्त्रायलमध्ये इको पॉवर कंपनीने हा प्रकल्प यशस्वी केला आहे. यासंदर्भातील करारावर या आठवड्यात हस्ताक्षर होण्याची शक्यता केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. (Sea Waves Electricity Generation)
(हेही वाचा – Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी; प्रयागराजकडे जाणाऱ्या १८ भाविकांचा दुर्घटनेत मृत्यू)
कोणत्या देशांत समुद्रांच्या लाटांपासून वीज निर्मिती होते?
इस्त्रायलच्या तेल अवीवमध्ये मुख्यालय असलेली इको वेव पॉवरने काही देशांमध्ये समुद्रांच्या लाटांपासून वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प यशस्वी केला आहे. त्यात इस्त्रायल, स्पेनमधील जिब्राल्टर , पुर्तगाल या ठिकाणांचा समावेश आहे. या ठिकाणी पाच ते 20 मेगावॅट वेव एनर्जी प्रकल्प सुरु आहे. त्याच तंत्रज्ञानाचा वापर करुन मुंबईतील समुद्र किनारी वीज निर्मिती केली जाणार आहे. (Sea Waves Electricity Generation)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community