Bomb Threat : भोपाळमधील एका शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी; तेलगू भाषेत मुख्याध्यापिकेला पाठवला ईमेल

71
Bomb Threat : भोपाळमधील एका शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी; तेलगू भाषेत मुख्याध्यापिकेला पाठवला ईमेल
Bomb Threat : भोपाळमधील एका शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी; तेलगू भाषेत मुख्याध्यापिकेला पाठवला ईमेल

मध्य प्रदेशची (Madhya Pradesh) राजधानी भोपाळमधील (Bhopal) पिपलानी पोलीस स्टेशन परिसरातील खजुरी रोड येथील हरमन मायनर स्कूलला बॉम्बने (Bomb Threat) उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. दि. १५ फेब्रुवारी रोजी शाळेच्या अधिकृत ईमेल आयडीवर इंग्रजी आणि तेलगू भाषेत एक ईमेल आला. त्यात शाळेची इमारत आयईडी स्फोटाने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. धमकीचा ईमेल आल्यानंतर बैठकीसाठी उपस्थित असलेले कर्मचारी, शिक्षक लगेच शाळेतून बाहेर आले आणि त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बॉम्ब डिस्पोजल आणि डॉग स्क्वॉड पथकांसह शाळेच्या परिसराची तपासणी केली. याशिवाय एटीएस (दहशतवादविरोधी पथक) पथकही तपासासाठी पोहोचले. (Bomb Threat)

( हेही वाचा : पुण्यात CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते विशेष कामगिरी केलेल्या पोलिसांचा सत्कार!

मुख्याध्यापिका सुनीता सिंह (Sunita Singh) म्हणाल्या की, दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.५३ वाजता एक मेल आला. ज्यामध्ये शाळा बॉम्बने उडवून दिली जाईल असे म्हटले होते. ज्या ईमेलद्वारे धमकी देण्यात आली होती तो तामिळनाडू राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री पलानिवेल थियागा राजन (पीटीआर) यांच्या नावाने तयार करण्यात आला होता. त्यात म्हटले होते की, हरमन मायनर स्कूलमध्ये आरडीएक्स वापरून स्फोट उघवून आणला जाईल. दुपारी २.५५ वाजेपर्यंत सर्वांना तिथून बाहेर काढा. मेल पाहिल्यानंतर मुख्याध्यापिका सुनीता सिंह (Sunita Singh) यांनी ताबडतोब ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर शाळेचा परिसर मोकळा करण्यात आला. या मेलमध्ये तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि त्यांच्या पक्ष द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) शी संबंधित एक लेख देखील आहे, अशी माहिती देण्यात आली. (Bomb Threat)

याप्रकरणी पोलिस स्टेशनचे प्रभारी अनुराग लाल (Anurag Lal) म्हणाले की, शाळेच्या प्रत्येक कोपऱ्याची झडती घेण्यात आली, परंतु कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. पोलिसांना माहिती मिळाली की दोन दिवसांपूर्वीच दिल्लीहून शाळेत पुस्तकांचे पार्सल आले आहे. संशयाच्या आधारे, बीडी आणि डीएस टीमने ते उघडून तपासणी केली, परंतु त्यात फक्त पुस्तके आढळली. आता सायबर सेलचे तज्ञ मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा आयपी अॅड्रेस ट्रेस करत आहेत. जेणेकरून त्याची ओळख पटवून आरोपीला अटक करता येईल. (Bomb Threat)

ईमेल तेलुगू भाषेत होता, कर्मचाऱ्यांनी त्याचे भाषांतर 

धमकीचा मेल तेलुगू भाषेत लिहिला होता. शाळेतील एका कर्मचाऱ्याला तेलुगू भाषा येत होती, त्याने मेलचे भाषांतर करून इतर कर्मचाऱ्यांना त्याबद्दल माहिती दिली. यानंतर शाळा ताबडतोब रिकामी करण्यात आली. त्यावेळी तिथे सुमारे ५० लोक उपस्थित होते. मात्र घडलेल्या प्रकरणानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले असून शाळेतील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. (Bomb Threat)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.