राष्ट्रीय जनता दलाचे (Rashtriya Janata Dal) प्रमुख लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी तीर्थक्षेत्र प्रयागराजमध्ये (Prayagraj) १४४ वर्षांनंतर होणाऱ्या भव्य दिव्य महाकुंभासंदर्भात (Mahakumbh 2025) गरळ ओकली आहे. कुंभला काही अर्थ नाही. कुंभ फालतू आहे, असे वादग्रस्त विधान लालू प्रसाद यादव यांनी केले. एएनआय या वृत्तसंस्थेला नवी दिल्लीतील चेंगराचेंगरीसंदर्भात प्रतिक्रिया देताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. (Lalu Prasad Yadav)
( हेही वाचा : Moradabad मध्ये अल्पवयीन मुलगी बेपत्ता; कुटुंबियांनी दिलशादवर केला लव्ह जिहाद आणि अपहरणाचा आरोप)
मुळात दि. १५ फेब्रुवारी रोजी रात्री नवी दिल्ली (New Delhi) रेल्वे स्थानकात प्रयागराजकडे जाणारी गाडी पकडण्यासाठी लोकांची गर्दी झाली. त्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर केंद्र सरकारने दि. १६ फेब्रुवारी रोजी जखमींना अडीज लाख, तर मृतांच्या वारसांना १० लाख रुपयांची मदतीची घोषणा केली. पण वादग्रस्त विधान करून कुंभ मेळ्याला बदमान करण्याचे षडयंत्र लालू यादव यांच्यासारखे अडगळीत पडलेले नेते करत आहेत. नवी दिल्ली रेल्वे स्थानकात प्रचंड गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीसाठी लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी रेल्वे आणि केंद्राला जबाबदार धरण्याचा प्रयत्न केला. (Lalu Prasad Yadav)
नेमकं काय घडले?
महाकुंभला (Mahakumbh 2025) जाणाऱ्या हजारो यात्रेकरूंची दि. १५ फेब्रुवारी रोजी रात्री नवी दिल्लीच्या (New Delhi) प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १६ वर गर्दी झाली होती. या प्लॅटफॉर्मवर ट्रेन येताच, प्लॅटफॉर्म क्रमांक १३ वर उपस्थित असलेले लोक ट्रेन आलेल्या प्लॅटफॉर्मच्या दिशेने धावले. गर्दी इतकी मोठी होती की पोलिसही काहीही करू शकले नाही. ज्यामुळे गर्दीत काहींना श्वसनाचा त्रास झाला आणि लोक बेशुद्ध पडले तर काहीची प्रकृती गंभीर झाली. (Lalu Prasad Yadav)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community