आता तिकीट, कॅब, हॉटेल सर्व काही एकाच अॅपवर बुक करता येणार ; कधीपासून वापरता येईल SwaRail अॅप

103
आता तिकीट, कॅब, हॉटेल सर्व काही एकाच अॅपवर बुक करता येणार ; कधीपासून वापरता येईल SwaRail अॅप
आता तिकीट, कॅब, हॉटेल सर्व काही एकाच अॅपवर बुक करता येणार ; कधीपासून वापरता येईल SwaRail अॅप

रेल्वे तिकीट बुकिंग (Railway ticket booking) असो की चालत्या रेल्वेत भोजन (SwaRail)किंवा स्थानकावर जाण्याआधी कॅब बुक करणे असो वा हॉटेल. या सर्वासाठी प्रवासी सामान्यपणे वेगवेगळे ॲप वापरतो. परंतु यंदा ही सुविधा एकाच ॲपमध्ये मिळेल. त्यासाठी स्वरेल सुपर अॅप (SwaRail Super app) तयार करत आहे. या ॲपची १ हजार लोकांवर चाचणी केली जात आहे. आता दहा हजार लोकांद्वारे त्याचे परीक्षण सुरू आहे. (SwaRail)

हेही वाचा-New Delhi Railway Station Stampede : ‘रेल्वेची ती एक सूचना आणि…’ ; हमालाने सांगितलं नेमकं काय घडलं?

हे ॲप एप्रिलनंतर कधीही प्रवाशांसाठी उपलब्ध होईल, असे सांगितले जाते. त्यात व्हील चेअर बुकिंग (Wheelchair booking), मेडिकल इमर्जन्सी, पोलिसांशी संपर्क साधण्याचीदेखील व्यवस्था आहे. ॲपची निर्मिती रेल्वेच्या सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सेंटर (Railway Information Center) (क्रिस) युनिटने दोन वर्षांत तयार केले आहे. ते अँड्रॉइड व आयआेएस या दोन्हीवर चालेल. (SwaRail)

हेही वाचा-New Delhi Railway Station Stampede: चेंगराचेंगरीतील मृतांच्या वारसांना १० लाख, तर जखमींना अडीच लाख देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

रेल्वेचे एक अधिकारी म्हणाले, हे ॲप सिंगल सोल्युशन विंडोसारखे काम करेल. म्हणजे रेल्वे गाड्यांची स्थिती, तिकीट बुकिंग, भोजनाची ऑर्डर देणे सुविधाही उपलब्ध करून देऊ शकेल. या सर्व गरजांसाठी पेमेंटचा पर्याय असेल. सध्या सर्वांनाच वेगवेगळ्या गरजांसाठी अनेक प्रकारचे ॲप वापरावे लागतात. नवीन ॲपमध्ये तसे नाही. त्यात एकदा माहिती दिल्यानंतर पुन्हा काहीही भरावे लागत नाही. (SwaRail)

‘या’ सुविधा असतील
आरक्षित-अनारक्षित व प्लेटफॉर्म तिकीट बुकिंग, ऑनलाइन फूड ऑर्डर, पार्सल बुकिंग, हॉटेल-कॅब व रूम बुकिंग, आसनाची स्थिती, ब्रेक जर्नी तिकिटाचा तपशील, गाडीच स्थिती, नैसर्गिक संकटाची माहिती, चोरी व इतर गुन्ह्यांच्या तक्रारीची ऑनलाइन व्यवस्था, व्हीलचेअर बुकिंग, कुली बुकिंग, कुलीस प्रीपेड पेमेंट, बोगी क्लिनिंग रिक्वेस्ट, बोगीमधील तांत्रिक दोष दूर करण्यासाठी विनंती, थेट रेल्वे नसल्यामुळे प्रवास मार्ग बदलण्यासाठी तिकिटाची स्थिती जाणून घेणे, सेवेत घट, भाड्याचा परताव्यासाठी विनंतीही करता येईल. (SwaRail)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.