Arvind Kejriwal यांचा नवा प्रताप; मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले अधिकृत X अकाऊंटचे आधी नाव बदलले, मग…

151
Arvind Kejriwal यांचा नवा प्रताप; मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले अधिकृत X अकाऊंटचे आधी नाव बदलले, मग...
Arvind Kejriwal यांचा नवा प्रताप; मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले अधिकृत X अकाऊंटचे आधी नाव बदलेल, मग...

भाजपाने दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मुख्यमंत्री कार्यालयाचे अधिकृत ‘एक्स’ हँडल ‘चोरण्याचा’ आरोप केला आहे. या आरोपानंतर दिल्लीत राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. (Arvind Kejriwal)

‘@CMODelhi’ ‘एक्स’ हँडल कोणाच्याही वैयक्तिक मालकीचे नाही. तर ‘@CMODelhi’ हे अकाऊंट मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रतिनिधीत्व करते. त्याचे नाव अरविंद केजरीवाल यांनी बदलून ‘@KejriwalAtWork’ असे केले होते. दिल्ली भाजपाचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी पत्रकारांना सांगितले की, अरविंद केजरीवाल यांनी ‘@CMODelhi’ हे ‘एक्स’ हँडल अकाऊंटचे नाव बदलून त्याला आपले अकाऊंट केले. त्यामुळे ही सरकारी निधीची लूट आहे. ही डिजीटल लूट आहे, असा आरोपही भाजपाचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी केली. तसेच एलजीकडे मागणी केली की, दिल्ली सरकारच्या आयटी विभागाकडे एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. लवकरच तपास सुरु करून कारवाई करावी, अशी ही सचदेवा यांची मागणी आहे.

दिल्लीकरांची डिजीटल लूट

त्यानंतर अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) यांनी हे अकाऊंटच डिलीट केले आहे. दिल्ली भाजपा अध्यक्ष सचदेवाने सोशल मीडियावर आपला रोष व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी लिहले की, माननीय उपराज्यपाल, मी आपले लक्ष दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारी डिजीटल संसाधनांच्या वापराकडे वेधू इच्छितो. दिल्ली सरकारने पैसे आणि संसाधनांचा वापर करून काही वर्षांपूर्वी स्वत: चे असे एक ‘एक्स’ अकाऊंट मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीसाठी तयार केले होते. त्याला ‘@CMODelhi’ असे नाव देण्यात आले असून हे अकाऊंट आता अरविंद केजरीवालांनी आपले खाजगी अकाऊंट करून टाकले आहे. त्यामुळे ही दिल्लीकरांची डिजीटल लूट आहे. यासंदर्भात तपास करून कारवाई करावी आणि हा प्रकार थांबवावा, असे ही सचदेवा यांनी लिहले.

मुख्यमंत्री कार्यालयाची केली पंचाईत

दरम्यान अरविंद केजरीवाल यांनी @CMODelhi हे अकाऊंट डिलीट केल्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाला हे अकाऊंट पुन्हा सुरु करता येत नाही आहे. कारण याचं नावाने अनोळखी व्यक्तीने अकाऊंट सुरु केले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री कार्यालयाने ‘एक्स’ ला पत्र लिहत, ‘@CMODelhi’ या हँडलचा आयडी आणि पासवर्ड त्यांना देण्यात यावा अशी मागणी केली आहे. जेणेकरून त्याचा गैरवापर होऊ नये. सध्या, या प्रकरणावर X कडून मिळालेल्या कोणत्याही प्रतिसादाबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

अमित मालवीय यांनी दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

यासंदर्भात भाजपाचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय (Amit Malviya) यांनी पोस्टमध्ये लिहले की, दिल्ली विधानसभा निवडणुक हरल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी @CMODelhi चे अधिकृत ‘एक्स’ आणि यूट्यूब अकाऊंट निष्क्रिय करत नाव बदलले. हे डिजीटल ‘एक्स’ अकाऊंट सुरुवातीला @CMODelhi नावाने ओळखले जात होते. त्याचे नाव बदलून केजरीवाल यांनी @KejriwalAtWork केले. @CMODelhi अकाऊंट हे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे अधिकृत ‘एक्स’ अकाऊंट आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची संपत्ती नाही. त्या अकाऊंटसोबत छेडछाड केल्याने राज्याच्या संपत्तीचे नुकसान केल्याचे आणि नियंत्रण आपल्या हातात घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. (Amit Malviya)

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने (BJP) २७ वर्षांचा वनवास संपवत, दिल्लीची सत्ता काबीज केली आहे. या निवडणुकीत ‘आप’ला २२ जागा जिंकता आल्या आहे. तरी भाजपाने दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होईल? हे निश्चित केलेला नाही. त्यामुळे नवीन मुख्यमंत्री आपला पदभार स्वीकारल्यावर एक्स अकाऊंटमधील माहितीत बदल केले जातील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.