नवीन इन्कम टॅक्स विधेयकाचा पॅन आणि आधार कार्डवर काय होणार परिणाम ?

नवीन आयकर विधेयक 2025 हे आयकर कायदा 1961 ची जागा घेईल. हा नवीन कायदा एप्रिल 2025 पासून लागू होण्याची शक्यता आहे.

या विधेयकानुसार, जर तुम्ही पॅनसाठी अर्ज करत असाल आणि आयटीआर दाखल करणार असाल तर तुमच्याकडे आधार कार्ड असणे अनिवार्य असेल.

याशिवाय, ज्या व्यक्तींकडे पॅन आहे आणि ते आधारसाठी पात्र आहेत, त्यांना त्यांच्या आधार क्रमांकाची माहिती आयकर विभागाला द्यावी लागेल.

आधार न देणाऱ्यांचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल. या विधेयकात असे म्हटले आहे की आधार क्रमांकासाठी पात्र असलेल्या प्रत्येक व्यक्तीला पॅनसाठी अर्ज करताना आणि आयकर रिटर्नमध्ये आधार क्रमांक नमूद करणे आवश्यक असेल.

नव्या कायद्यानुसार, कोणत्याही व्यक्तीला पॅन मिळू शकते. पण तो भारताचा नागरिक असणे, अनिवार्य आहे.

जर एखाद्या व्यक्तीला पॅन मिळालेला नसेल, तर गरज पडल्यास ते त्यांचा आधार क्रमांक देऊ शकतात.