तुम्हाला लोकप्रिय अमेरिकन मार्शल आर्ट्स कॉमेडी-ड्रामा कोब्रा काई आठवत असेल, जो मूळ द कराटे किडचा सिक्वेल होता. ही मालिका २०१८ मध्ये प्रदर्शित झाली आणि तेव्हापासून ती खूप लोकप्रिय झाली आहे. YouTube वर त्याचे दोन सीझन रिलीज झाल्यानंतर, नेटफ्लिक्सने त्याचे हक्क विकत घेतले. यानंतर, कोब्रा काई सीझन ३, सीझन ४ आणि सीझन ५ ला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. (cobra kai season 6)
आनंदाची बाब म्हणजे नेटफ्लिक्सच्या लोकप्रिय शो कोब्रा काईचा शेवटचा सीझन सुरू झाला आहे आणि प्रेक्षकांमध्ये त्याची खूप चर्चा होत आहे. सीझन ६, भाग १ मधील कथेत नवीन थरार सुरु झाला आहे. या शोचे प्रमुख पात्र डॅनियल लारुसो (राल्फ मॅकचियो) आणि जॉनी लॉरेन्स (विल्यम झब्का) यावेळी त्यांच्या कराटे विद्यार्थ्यांना ‘सेकाई ताईकाई’ या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी तयार करत आहेत. (cobra kai season 6)
(हेही वाचा – kims hospital : कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजेच kims hospital कोणाच्या मालकीचं आहे?)
५ व्या सीझननंतर सर्वजण कोब्रा काई सीझन ६ ची आतुरतेने वाट पाहत होते. बऱ्याच काळानंतर, आता कोब्रा काईचा सीझन ६ प्रदर्शित झाला आहे आणि प्रेक्षक त्याबद्दल खूप उत्सुक आहेत. गेल्या सीझनमधील घटनांचा पात्रांच्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. नेहमीच न्यायाच्या मार्गावर राहिलेला डॅनियल लारुसो आता टेरी सिल्व्हरचे खरे हेतू उघड करण्यासाठी चोझेन तोगुचीसोबत काम करतोय. टेरी सिल्व्हरच्या हेराफेरी आणि फसवणुकीमुळे निराश झालेला डॅनियल यावेळी स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणखी खंबीर झाला आहे. त्यामुळे हा सीझन आणखीच रोमांचक असणार आहे. (cobra kai season 6)
‘कोब्रा काई’चा हा शेवटचा सीझन प्रेक्षकांना एका नवीन रोमांचक प्रवासावर घेऊन जाण्याचे आश्वासन देतो. उत्तम कथा आणि सशक्त पात्रे असल्यामुळे ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवते. हा सीझन नेटफिल्सवर १३ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदसित झाला आहे. कोब्रा काई मालिकेची खासियत असी आहे की ही मालिका नेहमीच प्रेक्षकांना खिळवून ठेवते. जुनी पात्रे असोत किंवा नवीन, प्रत्येकाची कहाणी आणि संघर्ष पूर्णपणे जिवंत वाटतो. ही मालिका केवळ कराटेच्या जगाचेच चित्रण करत नाही तर मानवी भावना आणि नातेसंबंधांच्या गुंतागुंती देखील अतिशय स्पष्टपणे सादर करते. त्यामुळे आजच ही मालिका पाहायला तुम्ही सुरुवात करु शकता. (cobra kai season 6)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community